शिवप्रहार न्युज - मला १५ बायका म्हणत विवाहितेचा छळ; बापाकडून ५० लाख आण...

शिवप्रहार न्युज -  मला १५ बायका म्हणत विवाहितेचा छळ; बापाकडून ५० लाख आण...

मला १५ बायका म्हणत विवाहितेचा छळ; बापाकडून ५० लाख आण...

   अहिल्यानगर (शिवप्रहार न्युज)- अहिल्यानगर जिल्हयातील कर्जत तालुक्यातील मिलगांव परिसरात सासरी नांदत असलेली विवाहीत तरुणी सौ.दिपाली आनंद पाचपुते ( वय २७ ) हिने नवऱ्याचे दुसऱ्या तरुणी बरोबर प्रेमसंबंध आहे. त्याबाबत विचारणा केली असता नवरा आनंद रोहीदास पाचपुते,सासरा रोहीदास रामभाऊ पाचपुते,सासू सुनिता रोहीदास पाचपुते यांनी तिला शिवीगाळ करत लाथाबुक्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. 

        आरोपी नवरा याने पत्नी दिपाली हिला म्हटले की, तुझ्या बापाकडून कंपनी टाकण्यासाठी ५० लाख घेवून ये, मला १५ बायका असून २२ मुले आहेत. तुझे आई-वडील माझे काहीही करू शकत नाही,तु मला फारकत दे असे धमकावले. म्हणुन वरील प्रमाणे पिडित दिपाली पाचपुते हिच्या फिर्यादीवरून नमूद आरोपींविरुद्ध मिरजगांव पोलिसांत भादवि कलम ४९८ (अ)३२३ ,५०४ ,५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सपोनि. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल रोकडे हे करीत आहे.