शिवप्रहार न्युज - कमलपूर बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करा-सप्ताह कमिटीची मागणी; ना.विखे पाटील यांचे अधिकाऱ्यांना आदेश…

कमलपूर बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करा-सप्ताह कमिटीची मागणी; ना.विखे पाटील यांचे अधिकाऱ्यांना आदेश…
श्रीरामपूर (प्रतिनिधी)-गोदावरी नदीवरील कमलपूर (ता.श्रीरामपूर) बंधारा तातडीने दुरुस्त करून शनी देवगाव (ता. वैजापूर) येथे होणाऱ्या अखंड हरीनाम सप्ताहाच्या वेळी भाविकांची होणारी गैरसोय टाळा. तसेच बंधाऱ्याची पाहणी करून,या कामास लगेच सुरुवात करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत ना. राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष दीपक पटारे, शरद नवले, गिरीधर आसने, बाबासाहेब चिडे, नानाभाऊ शिंदे, भाऊसाहेब बांद्रे यांच्यासह सप्ताह कमिटीतील शनी देवगाव, चेंडूफळ, अवलगाव, बाजाठाण,हमरापूर, भामाठाण,कमलपूर येथील राष्ट्रवादीचे वैजापूर तालुकाध्यक्ष विजय पवार, विलास पवार, गंगाधर बनसोडे, संजय मेघळे, रमेश मेघळे,रावसाहेब मुरकुटे,अशोक गोरे,नितीन शेळके, दिगंबर गोरे,हरिभाऊ दवंगे,दत्तात्रय शेळके, रविंद्र मुरकुटे,भैरव कांगुणे,विजय दवंगे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.शनि देवगाव येथे होऊ घातलेल्या गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरीनाम सप्ताहाच्या कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची व ना.विखे पाटील यांची भेट आयोजित करण्यात आली होती.यावेळी सप्ताह कमिटीच्या वतीने ना. विखे पाटील यांना सप्ताह ध्वजारोहणाचे निमंत्रणही देण्यात आले. ना. विखे पाटील यांनी या निमंत्रणाचा स्वीकार करत हा आपला बहुमान असून बेटावर आपली नितांत श्रद्धा आहे.सप्ताहाच्या कार्यात संबंधित गावांच्या प्रश्नांबाबत कुठल्याही प्रकारची अडचण येऊ दिली जाणार नाही असे आश्वासनही त्यांनी सप्ताह किमीटीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी सप्ताह कमिटीने पंचक्रोशीतील रस्त्यांसह कमलपूर बंधाऱ्याच्या दुरावस्थेकडे ना. विखे पाटील यांचे लक्ष वेधले.तसेच
कमलपूर येथील भाजप कार्यकर्त्यांनी टाकळीभन-कमलपूर,भोकर-कमलपूर तसेच माळवाडगाव-कमलपूर या रस्त्यांच्या दुरावस्थेसंदर्भात पालकमंत्री ना. विखे पाटील यांना सविस्तर निवेदन दिले.यासह सद्या अर्धवट स्थितीत असलेल्या भामाठाण-घोगरगाव रस्त्याचे उर्वरित काम तात्काळ सूरु करण्याची विनंतीही ना.विखे पाटील यांना कार्यकर्त्यांनी केली.त्यावर पालकमंत्री विखे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री वराळे यांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत.