शिवप्रहार न्यूज -झाड तोडल्याच्या कारणावरून श्रीरामपूर परिसरात तेरा वर्षाच्या मुलाला आई-वडीलांसह मारहाण

झाड तोडल्याच्या कारणावरून श्रीरामपूर परिसरात तेरा वर्षाच्या मुलाला आई-वडीलांसह मारहाण...
श्रीरामपूर- श्रीरामपूर शहराजवळ असणाऱ्या रांजनखोल गावामध्ये राहणारा मुलगा दुर्गेश आप्पासाहेब ओव्हाळ,वय -13 ,व्यवसाय, शिक्षण ,राहणार- रांजनखोल याला त्याचे शेजारी राहणारे एकनाथ जगताप,वय-६९ व अशोक जगताप राहणार-रांजनखोल यांनी झाड तोडल्याच्या कारणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दुर्गेश याचे आई-वडील यांना देखील यावेळी मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दुर्गेश हा जखमी झाल्याने त्याला शहरातील साखर कामगार हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.तेथे त्याने दिलेल्या जबाबावरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच याच प्रकणाच्या क्रॉस तक्रारीमध्ये एकनाथ रघुनाथ जगताप, वय 69,धंदा-शेती ,राहणार-रांजनखोल यांनीदेखील दुर्गेश व त्याचे वडील अप्पासाहेब तसेच इतरांविरुद्ध तक्रार दिल्याने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात याबाबत देखील क्रॅास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलिस नाईक श्री.शेलार हे पोलिस निरीक्षक श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे.