शिवप्रहार न्यूज -श्रीरामपूर च्या मंदिरात “गंजडींचा” वावर....
श्रीरामपूर च्या मंदिरात “गंजडींचा” वावर....
श्रीरामपूर -श्रीरामपूर शहरातील नेवासा रोड वरील अशोक कारखाना पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या श्री.मोकाशी मंदिरामध्ये गंजडींचा वावर असल्याची तक्रार स्थानिक हिंदू नागरिकांनी केली आहे.
या नागरिकांचे म्हणणे असे आहे की,श्री.मोकाशी मंदिरामध्ये रेल्वे रुळाच्या पलीकडील फकीरवाडा व नेवासारोड रेल्वे रूळ परिसरातील काही गांजा ओढणारे तरुण हे मंदिर परिसरात व मंदिराच्या आवाराच्या आत मध्ये येतात व त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी गांजा ओढतात.
या मंदीर परिसरामध्ये महिला व मुलींची ये-जा असते. त्यामुळे या गंजडी तरुणांकडून त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
तसेच त्या भागातील सामाजिक स्वास्थ्य बिघडले जात आहे. या भागातील तरुणांना या गंजडी लोकांमुळे गांजाचे व्यसन लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी पोलिसांनी लवकरात लवकर या गंजडींचा बंदोबस्त करावा अशी मागणी मोकाशी मंदिर परिसरातील हिंदू नागरिकांनी केली आहे.