शिवप्रहार न्युज - शिर्डी विमानतळ परिसरातील दुहेरी हत्याकांडातील ०२ आरोपींना १२ तासांत अटक;LCB चा कामगिरी…

शिर्डी विमानतळ परिसरातील दुहेरी हत्याकांडातील ०२ आरोपींना १२ तासांत अटक;LCB चा कामगिरी…
शिर्डी - घटनेची हकिगत अशी की, दिनांक 04/04/2025 रोजी रात्री साहेबराव पोपट भोसले, रा.दिघे वस्ती, पिंप्री रोड, काकडी ता.राहाता यांच्या राहत्या घरी अज्ञात आरोपीतांनी जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने कोणत्या तरी प्राणघातक हत्यारांनी (1) कृष्णा साहेबराव भोसले, वय 30 (2) साहेबराव पोपट भोसले, वय 60 यांना जीवे ठार मारून तसेच साकरबाई साहेबराव भोसले,वय 55 सर्व रा.दिघे वस्ती, पिंप्री रोड, काकडी ता.राहाता यांना गंभीर जखमी करून मोटार सायकल व मोबाईल चोरून नेला.याबाबत राहाता पोलीस स्टेशन गुरनं 171/2025 बीएनएस 2023 कलम 103 (1), 109(1), 311, 331 (8) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
तरी काकडी, ता.राहाता येथे घडलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्हयाची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ मा.श्री. राकेश ओला, पोलीस अधिक्षक अहिल्यानगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर,मा.श्री. शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग शिर्डी, यांनी तात्काळ घटनाठिकाणी भेट देऊन, गुन्हा उघडकीस आणणेबाबत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना सुचना देऊन समांतर तपास करणेबाबत आदेशीत केले.
नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/ हेमंत थोरात, पोसई/तुषार धाकराव, अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, गणेश लोंढे, संदीप दरंदले, अमृत आढाव, प्रमोद जाधव, जालींदर माने, बाळासाहेब खेडकर, रमीजराजा आत्तार, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, प्रशांत राठोड, भगवान थोरात, सुनील मालणकर, बाळासाहेब गुंजाळ, अरूण मोरे, उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर अशांचे तीन पथक तयार करून,पथकास गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले. दि.05/04/2025 रोजी तपास पथके तांत्रीक विश्लेषण व बातमीदाराच्या आधारे गुन्हयाचा तपास करत असताना सदरचा गुन्हा करणारे दोन संशयीत इसम हे टेम्पोमधुन सिन्नर मार्गे नाशिककडे जात असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाली.पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीवरून पळशी टोलनाका, सिन्नर, जि.नाशिक येथे सापळा रचुन संशयीत इसमांचा शोध घेऊन एका टेम्पोमध्ये पाठीमागील बाजुस बसलेले संशयीत दोन इसम मिळून आल्याने 1) संदीप रामदास दहाबाड, वय 18,2) जगन काशिनाथ किरकिरे, वय 25 दोन्ही रा.तेलीम्बरपाडा, ता.मोखाडा, जि.पालघर अशांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांना विश्वासात घेऊन गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता संदीप रामदास दहावाड याने त्याचे साथीदारासह रात्री 12.30 वा.सुमारास काकडी विमानतळ परिसरामधील एका घरामध्ये जाऊन दोन - तीन जणांना लाकडी दांडक्याने व फावडयाने मारहाण केली व चोरी केल्यानंतर पळून जात असलेबाबत माहिती सांगीतली.ताब्यात घेण्यात आरोपी नामे 1) संदीप रामदास दहाबाड, वय 18,2) जगन काशिनाथ किरकिरे, वय 25 दोन्ही रा.तेलीम्बरपाडा, ता.मोखाडा, जि.पालघर यांना गुन्ह्याचे तपासकामी राहाता पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले असुन पुढील तपास पो.नि.चव्हाण,राहाता पोलीस ठाणे हे करीत आहे.
तपास पथकास संशयीत आरोपीतांचा शोध घेणेकामी सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.संभाजी गायकवाड व सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांनी योग्य ती मदत केली आहे.
सदरची कारवाई मा.श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर, मा. श्री. शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.