शिवप्रहार न्यूज -पत्रकार दातीर खून प्रकरणातील फरार आरोपी अक्षय कुलथे यास यु.पी.मधुन Dysp संदीप मिटके यांच्या पथकाने केली अटक...  परराज्यात जावुन नगर पोलीसांची धडाकेबाज कामगिरी

शिवप्रहार न्यूज -पत्रकार दातीर खून प्रकरणातील फरार आरोपी अक्षय कुलथे यास यु.पी.मधुन Dysp संदीप मिटके यांच्या पथकाने केली अटक...   परराज्यात जावुन नगर पोलीसांची धडाकेबाज कामगिरी

पत्रकार दातीर खून प्रकरणातील फरार आरोपी अक्षय कुलथे यास यु.पी.मधुन Dysp संदीप मिटके यांच्या पथकाने केली अटक... 

परराज्यात जावुन नगर पोलीसांची धडाकेबाज कामगिरी...

राहुरी- 

       काही दिवसांपूर्वी राहुरी येथील पत्रकार श्री रोहिदास दातीर हे आपल्या घरी परतत असताना मल्हारवाडी रोडने अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते. त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला गुरनं.286/2021 भादवि कलम 363,341 वाढिव कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार दुधाळ यांनी करून आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी,वय 25 वर्ष,राहणार-जुने बस स्टँड जवळ, एकलव्य वसाहत, राहुरी व तोफिक मुक्तार शेख ,वय 21 वर्ष, राहणार- राहुरी फॅक्टरी ,तालुका राहुरी या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती.तसेच सदर गुन्हा Dysp. संदीप मिटके यांचेकडे वर्ग होताच गुन्ह्यातील मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे वय 46 यास नगर औरंगाबाद जाणारे रोडवरील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान समोरील हॉटेल गुरुदत्त येथून अटक केली होती. परंतु अक्षय कुलथे हा फरार होता. Dyspसंदीप मिटके यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी अक्षय कुलथे यास उत्तर प्रदेश मधील चटिया ता. बीनंदनकी ,जिल्हा -फत्तेपूर ,उत्तर प्रदेश येथून शिताफीने अटक करून फतेपुर येथील न्यायालयाच्या समक्ष हजर केले असता न्यायालयाने आरोपील 72 तासांची Transit remand custody दिली आहे.

                आरोपी अक्षय कुलथे याच्यावर पूर्वीचे पुढीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत -

1) राहुरी पो.स्टे. गु.र .नं.321/2016 भा द वी क 324, प्रमाणे          

2)439/2017 भा द वी क 457,380,34 प्रमाणे

3) 54/2017 मुं.पो.का.122 प्रमाणे

4)124/2017 मुं.पो.का. 122 प्रमाणे

5)886/2019 मुं.पो.का 122 प्रमाणे

6)286/2021मुं.पो.का 122 प्रमाणे

7) राहाता पोलीस स्टेशन गु. र. नं.266/2020 भादवि क.399,402 प्रमाणे

8) कोपरगाव शहर पो.स्टे.गु. र. नं.170/2020 भादवि क.395 प्रमाणे

9)कोपरगाव शहर पो.स्टे.गु. र. नं.171/2020 भादवि क.394 प्रमाणे

       सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे यांचे मार्गदर्शनाखाली कर्तव्यदक्ष DySP श्री.संदीप मिटके , PI नंदकुमार दुधाळ, PSI शेळके, PSI निलेश कुमार वाघ, PSI नीरज बोकील, PSI. मधुकर शिंदे,ASI राजेंद्रअरोळे, HC सुरेश औटी, PN फुरकान शेख,PN शिवाजी खरात, PC रवींद्र मेढे, विकास गुंजाळ, सुनील शिंदे, नितीन शिरसाठ, आजिनाथ पाखरे आदींनी केली.

             या कामगिरीबाबत नागरिकांकडुन पोलीसांचे अभिनंदन करण्यात येत आहे.