शिवप्रहार न्यूज- बेळगाव,कर्नाटक च्या बसवराज नायक याला श्रीरामपूर पोलिसांनी पकडले...

बेळगाव,कर्नाटक च्या बसवराज नायक याला श्रीरामपूर पोलिसांनी पकडले...
श्रीरामपूर -
तालुक्यातील नायगाव येथील संत जनार्दन कुट्टी येथे आरोपी बसवराज रामाप्पा नायक,वय 31 वर्ष,राहणार-रडा रेड्डी,तालुका -अथणी,जिल्हा-बेळगाव ,राज्य -कर्नाटक व भाऊराव सहकारी मोरे ,वय-30 वर्ष,राहणार -शिरसगाव ,तालुका -वैजापुर ,जिल्हा -औरंगाबाद यांना ओळख लपवुन चोरी घरफोडी चे साहित्य गुन्हा करण्यासाठी बाळगले व एक लोखंडी गजासह संशयास्पद रित्या मिळून आले. म्हणून पोलीस हवालदार गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 95 /2021 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 122 प्रमाणे दिनांक 28 /4 /2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार श्री गोरे हे करीत आहेत.