शिवप्रहार न्यूज - केरळ राज्यातील दोन चंदन तस्कर जेरबंद;श्रीरामपूर डीवायएसपींची कारवाई...

शिवप्रहार न्यूज - केरळ राज्यातील दोन चंदन तस्कर जेरबंद;श्रीरामपूर डीवायएसपींची कारवाई...

केरळ राज्यातील दोन चंदन तस्कर जेरबंद;श्रीरामपूर डीवायएसपींची कारवाई...

श्रीरामपूर-आज दि.12/06/2021 रोजी श्रीरामपूर उपविभागाचे Dy.s.p. श्री.संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, केरळ राज्यातील चंदन तस्कर टोळी ही राहुरी हद्दीतून बुऱ्हाणपूर,मध्यप्रदेश येथे चोरीचे चंदन घेऊन जाणार आहे. 

      मिळालेल्या माहितीवरून राहुरी कारखाना/फॅक्टरी येथे सापळा लावून छापा टाकला असता अंदाजे 45 लाख रुपये किमतीचे चंदन वाहनासह मिळून आले असून आरोपी 1) अब्दुल मोहम्मद निसाद ,वय 32 वर्षे ,राहणार-अंजामैल हाऊस ,ता. बैदाडका,जि.कासारगुड, केरळ 2) अब्दुल फक्रुद्दीन रहमान,वय 41 वर्ष,रा.अमितकला हाऊस ,ता. ऐनमाकजा,जि.कासारगुड,केरळ यांचेविरुध्द राहुरी पोलीस स्टेशन येथे मुद्देमालची मोजदाज करून प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

      सदरची कारवाई मा. श्री.मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली Dy.s.p. संदीप मिटके, PSI मधुकर शिंदे, PSI निलेश कुमार वाघ, स. फौ.राजेंद्र आरोळे, पो.हे.कॉ.सुरेश औटी, पो. ना.जानकीराम खेमनर, पो. कॉ. गणेश फाटक, किशोर जाधव, सुनील दिघे, राहुल नरोडे आदींनी केली.