शिवप्रहार न्यूज- बाबाजींची परंपरा समाजासाठी वरदानकारी;वेरूळ येथे गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता…
बाबाजींची परंपरा समाजासाठी वरदानकारी;वेरूळ येथे गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता…
प्रतिनिधी /संभाजीनगर
संपादक :- मयुर फिंपाळे
जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांनी भाविकांच्या सर्वागीण कल्याणासाठी विविध परंपरा सुरू केल्या. बाबाजींनी सुरू केलेल्या या परंपरा समाजासाठी वरदानकारी ठरत आहेत. भाविकांनी सद्गुरूंच्या अज्ञाचे पालन करावे. त्यातून आपली खऱ्या अर्थाने अध्यात्मिक प्रगती आणि आर्थिक समृद्धी होऊ शकेल, असे प्रतिपादन जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी जी महाराज यांचे उत्तरअधिकारी स्वामी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांनी केले.
जय बाबाजी परिवाराच्यावतीने श्री क्षेत्र वेरूळ येथे गेल्या आठवड्याभरापासून विद्यार्थी संस्कार शिबिर,जपानुष्ठान,यज्ञ उपनय संस्कार,प्रवचन,सत्संग, हस्तलिखित नामजप साधना यासह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या सोहळ्याची सांगता आणि गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त उपस्थित हजारो भाविकांना धर्म उपदेश करताना महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज बोलत होते. दरम्यान, गुरुपौर्णिमाचा महोत्सवाचा प्रारंभ ब्रह्म मुहूर्तावर करण्यात आला. पहाटे ४ वाजता संकल्पित समाधी मंदिर श्री बाबाजींची मूर्तीचा ब्रह्मवंदनाच्या मंत्रघोषक महाअभिषेक करण्यात आला. पहाटे ५ वाजता नित्य नियम विधी, ध्यान, प्रणायाम, भागवत वाचन, प्रवचन,सत्संग आदी कार्यक्रम झाले. त्यानंतर बाबाजींच्या पालखीचे मिरवणूक काढण्यात आली. ब्रह्मवंदनांच्या मंत्रघोषांमध्ये स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या हस्ते पाद्यपूजन सोहळा संपन्न झाला. त्याप्रसंगी स्वामी शांतिगिरीजी महाराज यांची गुरुपूर्णिमानिमित्त भाविकांच्या वतीने लाडूची तुलना करण्यात आली. आश्रमिया संत स्वामी सेवागिरी महाराज, ब्रह्मचारी रामानंद महाराज यांनी विशेष मार्गदर्शन केले.