शिवप्रहार न्यूज -श्रीरामपुरात मुलींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला अग्निडाग...

शिवप्रहार न्यूज -श्रीरामपुरात मुलींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला अग्निडाग...

श्रीरामपुरात मुलींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला अग्निडाग...

श्रीरामपूर : आज समाजातुन वंशाचा दिवा मुलगाच ,शेवटी पार्थिवाला अग्निडाग आणि पाणी पाजण्याचा अधिकारही मुलाचाच हा समज हळूहळू दूर होत आहे. शहरातील ज्ञानेश्वर माधवराव कांगुणे ,वय ७२ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. कांगुणे यांना मुलगा नसल्याने त्यांच्या तिन्ही मुलींनी त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला आहे.

          श्री. कांगुणे हे सोमैय्या ऑरग्यानिक केमिकल्स येथे ४० वर्षे नोकरी करून एच.आर मॅनेजर म्हणून निवृत्त झाले होते.

गुरुवारी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर तिन्ही मुलीनी स्वत: त्यांचे अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले. श्री.कांगुणे यांचे भाऊ पत्रकार सुरेश कांगुणे, जावई विलास पवार, रोहित जगाताप ,पुण्यनगरी उपसंपादक समीर दाणी,कुटुंबातील सदस्य ,नातलगांनी या निर्णयाला पाठींबा दिला. लहान मुलगी अपेक्षा दाणी हिने पाणी पाजले व अग्निडाग दिला. तर मोठी मुलगी आश्रेषा पवार व अर्चना जगताप यांनी बाकीचे अंत्यविधी पार पाडले.