शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात छत्रपती संभाजी महाराज जलतरण तलावमध्ये पोहणाऱ्यांची प्रचंड गर्दी;कोरोना नंतर ०२ वर्षांनी सुरु झाला तलाव…

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात छत्रपती संभाजी महाराज जलतरण तलावमध्ये पोहणाऱ्यांची प्रचंड गर्दी;कोरोना नंतर ०२ वर्षांनी सुरु झाला तलाव…

श्रीरामपुरात छत्रपती संभाजी महाराज जलतरण तलावमध्ये पोहणाऱ्यांची प्रचंड गर्दी;कोरोना नंतर ०२ वर्षांनी सुरु झाला तलाव…

श्रीरामपूर- शहरातील श्रीरामपूर नगरपालिकेच्या श्री.छत्रपती संभाजी महाराज जलतरण तलाव मध्ये पोहणाऱ्यांनी एकच गर्दी केली आहे. गेल्या २ वर्षापासून कोरोनामुळे बंद असलेला जलतरण तलाव दोन वर्षानंतर उन्हाळ्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये सुरू झाल्याने जलतरणपटूंनी समाधान व्यक्त केले आहे.

         जलतरण तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने नागरिकांनी बॅचेस वाढवण्याची मागणी केली आहे. जलतरण तलाव सुरू करण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते, संघटना यांनी वेळोवेळी श्रीरामपूर नगरपालिकेकडे मागणी केली होती.