शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर तालुक्यातुन कॅालेज तरुणीला फूस लावून पळविले…

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर तालुक्यातुन कॅालेज तरुणीला फूस लावून पळविले…

श्रीरामपूर तालुक्यातुन कॅालेज तरुणीला फूस लावून पळविले…

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील शिरसगाव येथील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून कशाचे तरी अमिष दाखवून पळवून नेले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात काल अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

        सदरील अल्पवयीन मुलगी ही बोरावके महाविद्यालयात शिक्षण घेत होती.सकाळच्या दरम्यान शिरसगाव येथून महाविद्यालयात परिक्षेची चौकशी करून येते असे सांगून कॉलेजला जाण्यासाठी ती गेली असता सायंकाळपर्यंत घरी परतलीच नाही. तिचा नातेवाईक, मित्र-मैत्रीणी, तसेच बाहेरगाव येथील नातेवाईक येथे सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या तिच्या भावाकडे व मावशीकडेही चौकशी केली असता तेथेही ती मिळून आली नाही. 

        मुलीचे वर्णन-ती रंगाने गोरी असून शरीर बांधा सडपातळ आहे. केस काळे व मोठे असून नाक सरळ, उंची ५ फूट ३ इंच, अंगात काळ्या रंगाचा सलवार, कुर्ता, पायात सँडल अशा वर्णनाची आहे. तिला कोणीतरी कशाचे तरी अमिष दाखवून फूस लावून पळवून नेले असल्याचे तिच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. 

       याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुध्द काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.