शिवप्रहार न्यूज- मटनावरून खुनाचा प्रयत्न ; पोलीस ठाण्यात ३०७ दाखल ....
नगर – तालुक्यात बालेवाडी गावात आरोपींनी मटन दिले नाही म्हणून फिर्यादी अंगणवाडी सेविकेसह चार जणांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
याबाबतची हकीकत अशी की फिर्यादी सौ.सिमा गणेश पालवे , वय २५ ,व्यवसाय-अंगणवाडी सेविका ,रा.बाळेवाडी ता.नगर या त्यांच्या घरासमोर असतांना आरोपी १.चंद्रकांत उर्फ दाद्या बाळासाहेब सानप,२.प्ररमेश्वर उर्फ भमडया पालने ३.बाळासाहेब मोहन पालवे व इतर चार आरोपी आले आणि सिमा पालवे यांना मटन का दिले नाही असे म्हणून शिवीगाळ करून , सर्व आरोपींनी मिळून फिर्यादी , फिर्यादींचा पती ,सासू ,सासरे व भाया अश्यांना कुऱ्हाडीने ,काठीने व दगडाने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून काल दि.०९/०४/२०२१ रोजी नगर तालुका पो.ठाण्यात कलम ३०७ इत्यादी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास PSI जारवाल करीत आहे.