शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरातील अवैध धंद्यांविरोधातील “शिवप्रहार”च्या आमरण उपोषणाला विविध संघटनांचा पाठिंबा;प्रशासनाला मात्र अवैध धंद्यावाल्यांना रोखता येईना…

श्रीरामपुरातील अवैध धंद्यांविरोधातील “शिवप्रहार”च्या आमरण उपोषणाला विविध संघटनांचा पाठिंबा;प्रशासनाला मात्र अवैध धंद्यावाल्यांना रोखता येईना…
श्रीरामपूर - श्रीरामपूर शहर व तालुक्यातील अवैध धंद्यामुळे येथील नवतरुण पिढी व अनेक महिलांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे.त्यामुळे अवैध धंदे बंद व्हावे.यासाठी “शिवप्रहार प्रतिष्ठान युवा आघाडी”च्या वतीने पुकारण्यात आलेल्या आमरण उपोषणाला आज अनेक संघटनांनी लेखी पत्रकासह जाहीर पाठिंबा दिला.
यामध्ये राष्ट्रीय वारकरी परिषद, राष्ट्रीय लहुजी सेना, भिम प्रहार सामाजिक संघटना, महाराष्ट्र नाभिक महामंडळ,हिंदू जनजागृती समिती,बेलापूर रोड मित्र मंडळ बजरंग नगर,जय मल्हार ग्रुप,राजमाता जिजाऊ मित्र मंडळ इत्यादी संघटनांनी पाठिंबा दिला.
एकीकडे हे आमरण उपोषण चालू असताना दुसरीकडे श्रीरामपूरमध्ये अवैध धंदे राजरोसपणे चालू असल्याचे दिसले.प्रशासनाला या अवैध धंदे चालकांच्या मुसक्या आवळण्यात अद्यापपर्यंत यश आलेले नाही.त्यामुळे जर अवैध धंदे बंद झाले नाही तर “शिवप्रहार प्रतिष्ठान युवा आघाडी”च्या वतीने सर्व अवैध धंद्यांचे पुरावे प्रशासनाला देण्यात येईल असा इशारा चंद्रशेखर(चंदू)आगे यांनी दिला.
यावेळी उपोषणस्थळी राष्ट्रीय वारकरी परिषदेचे नगर जिल्हाध्यक्ष हभप वेणुनाथ महाराज विखे,मा.संचालक सिद्धार्थ मुरकुटे,मा.नगरसेवक राजेंद्र सोनवणे,संजय गांगड,भाजपाचे मारुती बिंगले,हभप बाळासाहेब हानापुने, हभप रामेश्वर झुराळे,राष्ट्रीय लहुजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धर्मराज मुरलीधर भारस्कर, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वाघ,भिमप्रहार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संदीप जगताप, हिंदू जनजागृती समितीचे विजय गागरे, विजय वांगे,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र धनगे पाटील,अमोल आसकर,भिमशक्ती मित्र मंडळाचे गौतम मोरे,प्रवीण त्रिभुवन,जय मल्हार संघटनेचे सुनील इंगळे,संगमनेर रोड मित्र मंडळाचे प्रतिक देशमुख,मराठा युवा समितीचे अध्यक्ष मनोज शेळके, संपादक मयूर पिंपळे,रवी छतवाणी,लोकेश बालानी, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती.अश्विनी सोमवंशी,मातंग समाज मंचचे मोहन आढांगळे, संपादक स्वामीराज कुलथे, जितेंद्र चव्हाण,मंगेश भोसले,अमोल गवारे,शौकत शेख यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली.