शिवप्रहार न्यूज- नगरपालीका ज्यांना फोन करेन त्यांनीच वाचनालयासमोर लसीकरण साठी यावे....
नगरपालीका ज्यांना फोन करेन त्यांनीच वाचनालयासमोर लसीकरण साठी यावे....
श्रीरामपूर- शहरात काल गुरुवार दि. २०/०५/२०२१ रोजी आगाशे हॉल ,आझाद मैदान कोव्हिड-१९ लसीकरण केंद्र श्रीरामपूर येथे कोव्ह्यक्सिन लसीच्या १४० डोससाठी लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले होते. फक्त नगरपालिका श्रीरामपूर येथून लसीकरण सत्र साठी फोनद्वारे संपर्क साधलेल्या नागरिकांनीच आझाद मैदान,वाचनालय येथे उपस्थित राहायचे आहे. उर्वरित नागरिकांना लवकरात लवकर संपर्क केला जाईल. ज्यांना संपर्क साधला गेलेला नसेल त्यांनी लसीकरण केंद्रावर जावू नये अथवा गर्दी करू नये. पात्र लाभार्थी यांना प्राधान्य क्रमांकानुसारच कोव्हिड -१९ लसीकरण साठी संपर्क साधला जात आहे ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी अशी प्रशासनाकडुन करण्यात आली आहे.