शिवप्रहार न्यूज-श्रीरामपुरातील हुसेननगर मधील सराईत गुन्हेगार १ वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार…
श्रीरामपुरातील हुसेननगर मधील सराईत गुन्हेगार १ वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार…
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. १ मधील हुसेननगर भागात राहणार सौरभ संजय शिंदे या सराईत गुन्हेगाराला १ वर्षासाठी हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती डीवायएसपी संदीप मिटके यांनी दिली. सराईत गुन्हेगार सौरभ शिंदे याचेवर भादंवि कलम ३७९, ३८०, ४५७, ३९२/३४ याकल्मान्वये श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तब्बल ४ गुन्हे दाखल आहेत.
श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संजय सानप यांनी सदर आरोपीचा हद्दपार प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी श्रीरामपूर यांचेकडे पाठविला होता. त्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडून आरोपीची प्राथमिक चौकशी करीत डीवायएसपी संदीप मिटके यांच्याकडे चौकशी करिता पाठविले होते. त्यावर चौकशी करून मिटके यांनी उपविभागीय दंडाधिकारी श्रीरामपूर विभाग यांना अहवाल तयार करून पाठविला. सदर अहवाल ग्राह्य घरून प्रांताधिकारी अनिल पवार यांनी सौरभ संजय शिंदे यास नगर जिल्ह्यातून श्रीरामपूर, राहरी, नेवासा, राहाता, संगमनेर, कोपरगाव, या तालुक्यांतून १ वर्षाकरिता हद्दपार करण्याचे आदेश काढले आहे. आरोपी सौरभ शिंदे हा वरील तालुक्याच्या परिसरात आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
डीवायएसपी संदीप मिटके यांनी केले आहे.