शिवप्रहार न्यूज- बेलापूररोड वरील काळे रसवंतीजवळ पोलिसांनी मुद्देमालासह वाळूवाल्याला पकडले…

बेलापूररोड वरील काळे रसवंतीजवळ पोलिसांनी मुद्देमालासह वाळूवाल्याला पकडले…
श्रीरामपूर- श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचा हद्दीमधील असणाऱ्या बेलापूर रोडवरील काळे रसवंतीजवळ एक बोलेरो पिकअप मालवाहतूक गाडी त्यामध्ये भरलेली वाळू भरलेली अशा स्थितीत पोलिसांनी ही गाडी पकडली.याप्रकरणी Dy.SP श्री.संदीप मिटके यांच्या पथकातील पोलिस शिपाई नितीन शिरसाट यांच्या तक्रारीवरून आरोपी अच्युत भाऊसाहेब चौधरी,वय -सत्तावीस,राहणार -चांदेगाव,तालुका राहुरी याच्याविरोधात वाळू चोरी व भारतीय पर्यावरण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच आरोपी अटक करण्याचे काम चालु आहे.
पोलिसांनी पकडलेला मुद्देमाल हा दोन लाख पाच हजार रुपये किमतीचा असून आरोपीने वाळू प्रवरा नदीपात्रातून कोणतीही परवानगी नसताना चोरून आणल्याचे फिर्यादीने त्यांच्या तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणी पोलिस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ढोकणे हे पुढचा तपास करीत आहेत.