शिवप्रहार न्यूज- गांधी पुतळा चौकात ७.५ लाखाच्या सोन्यासह गंठण चोर पकडले…

गांधी पुतळा चौकात ७.५ लाखाच्या सोन्यासह गंठण चोर पकडले…
श्रीरामपूर - महिलांच्या गळ्यातील गंठण चोरणारे गंठण चोर श्रीरामपूर शहरातील एका सोनाराकडे येत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे PI श्री.अनील कटके यांना मिळाली.त्यानुसार त्यांच्या पथकाने गांधी पुतळा चौक ,श्रीरामपूर या ठिकाणी सापळा रचून श्रीरामपूर परिसरात राहणारे आरोपी विशाल भोसले ,संदीप काळे, लहू काळे ,योगेश पाटेकर यांना ताब्यात घेतले आहे.
वरील आरोपींवर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील ,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल ,अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर ,डीवायएसपी संदीप मिटके, राहुल मदने,अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके यांच्या पथकाने केली.