शिवप्रहार न्यूज- नेवासा फाट्यावरील गोळीबार प्रकरणात राजकीय दबावाची चर्चा…
नेवासा फाट्यावरील गोळीबार प्रकरणात राजकीय दबावाची चर्चा…
नेवासा (प्रतिनिधी) - नेवासा येथील नेवासा फाटा भागात सेंट मेरी हायस्कूलजवळ आकाश पोपट कुसळकर, वय २०,रा. संभाजीनगर, नेवासा हा तरूण त्याचा मित्र अमोल शेलारसोबत दुकानासमोर बोलत असताना तेथे अनिल चव्हाण, रा.नेवासा फाटा, मयूर वाघ, रा-नेवासा व ज्ञानेश्वर दहातोंडे,रा.नेवासाफाटा व १ जण अनोळखी तरुण असे अचानक आले. त्यांनी अमोल याला शिवीगाळ करत दमदाटी करू लागले.
तेव्हा आकाश पोपट कुसळकर हा भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडला असता अनिल चव्हाण याने त्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून जखमी केले.तसेच अमोल शेलार याच्या डोक्यातही बिअरची बाटली मारली. त्यावेळी मयूर वाघ याने त्याच्याजवळील गावठी कट्टयातून गोळी झाडुन हवेत फायर केला.
त्यानंतर मयूर वाघ हा अमोल शेलारच्या पाठीमागे पळत जावून नेम धरून त्याने गोळ्या झाडल्या मात्र त्या गोळया हुकल्या. लोक जमा झाल्याने आरोपी पळून गेले. काल ७.३० वा. हा प्रकार घडला. वरील प्रमाणे आकाश पोपट कुसळकर याने नेवासा पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपी अनिल चव्हाण, मयूर वाघ, ज्ञानेश्वर दहातोंडे व एक अनोळखी अशा चार जणांविरूद्ध भादंवि कलम ३०७, ३२४, ५०४, ५०६, ३४, आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून डिवायएसपी मुंडे, पोनि.करे यांनी घटनास्थळी भेट दिली.
दरम्यान या प्रकरणात राजकीय लोकांकडून दबावतंत्राचा वापर होत असल्याची चर्चा नेवासा परिसरातील नागरिकांमध्ये चालू असल्याचे समजते.