शिवप्रहार न्यूज- ....तर श्रीरामपुरात अशोक कारखाना उभारणार ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प.
.....तर श्रीरामपुरात अशोक कारखाना उभारणार ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प.
श्रीरामपूर- कोरोना रुग्णांचे ऑक्सीजन अभावी मृत्यु होत आहे म्हणुन राज्यातील १९० कारखान्यांना वसंतदादा शुगर इ्स्टिट्यूटकडून ऑक्सीजन निर्मिती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी सविस्तर मार्गदर्शन करणारे पत्र कराखान्यांना देण्यात आले आहे.राज्यातील सहकारी आणि खासगी अशा १९० कारख्यानांना हे पत्र पाठवण्यात आले आहे.जिल्ह्यातील २२ कारखान्यांना हे पत्र देण्यात असुन जे कारखाने बंद आहेत. त्यांनी ऑक्सिजन किट खरेदी करून रुग्णालयांना पुरवावे असे या पत्रात आवाहन कण्यात आलेले आहे .आता किती कारखाने या पत्रास प्रतिसाद देतात ते लवकरच दिसणार आहे.
याबाबत श्रीरामपूर चे माजी आमदार भानुदास मुरकुटे तथा प्रवर्तक अशोक सहकर कारखाना यांनी सांगितले की,वसंतदादा शुगरचे पत्र मिळाले असुन ऑक्सिजन निर्मितीचा हा प्रकल्प कशा पद्धतीने उभारता येईल याची माहिती मिळवत आहोत. अशोक कारखान्यात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प कशा पदधतीने निर्माण केला जाऊ शकते याचा अभ्यास करून दोन दिवसात यासंदर्भात निर्णय घेऊ.