शिवप्रहार न्यूज-श्रीरामपुरातील अंबिका महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या मॕनेजर, चेअरमनसह संचालक मंडळावर फसवणूकीचा गुन्हा दाखल…
श्रीरामपुरातील अंबिका महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या मॕनेजर, चेअरमनसह संचालक मंडळावर फसवणूकीचा गुन्हा दाखल…
श्रीरामपूर (प्रतिनिधी) श्रीरामपूर शहरात नावाजलेल्या अंबिका महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या वेअरहाऊसमध्ये अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी व्यापाऱ्याच्या फिर्यादीवरून मॅनेजरसह पतसंस्थेची महिला चेअरमन व संचालक मंडळावर फसवणूकीचा गुन्हा श्रीरामपूर शहर पोलिसात दाखल झाल्याने पतसंस्था वर्तुळात व विश्वास टाकणाऱ्या खातेदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी रमेश रामलाल मुथ्था, चंदन ट्रेडींगतर्फे व करीता या व्यापाऱ्याने श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपी अंबिका महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या., श्रीरामपूर अण्णासाहेब कचरू जाधव, सौ. सुशिलाताई विठ्ठलराव नवले, कविचता देवेंद्र देशमुख, कुसूमताई चंदकुमार जाधव, सौ. रेखाताई बाळासाहेब घाटे, अनिता किरण माळी, सौ. लाताबाई प्रकाशराव बंगाळ, श्रीमती अनिता तुळशीराम शेळके, सौ. गिता रंजन गिरमे, सौ. कुसूमताई मुरलीधर मोहन, करीमाबी करीमभाई सय्यद, राजाराम निवृत्ती काकडे, सुरज वाल्मिक आदिक, सुभाष किसन आसने, दत्तात्रय काशिनाथ शेळके, ज्ञानदेव अण्णासाहेब पवार व इतर यांच्याविरूद्ध भादंवि कलम १२०(ब), १९२, ४०३, ४०६, ४०९, ४१८, ४२०, ४२१, ४२४, ४६७, ४६८, ४६९, ३४ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादी व्यापारी रमेश रामलाल मुथ्था यांनी तक्रारीत म्हटले आहे की, आरोपींनी १ ते १५ या सर्वांनी संगनमताने अपहार करून स्वतःच्या गैरकायदा आर्थिक फायदा घेतला असून फिर्यादीच्या तारण ठेवलेल्या ९१६.६० क्विंटल सोयाबीन अंबिका नागरी महिला पतसंस्था वेअरहाऊस येथील मालाचा परस्पर फिर्यादीची संमती न घेता परभारे न बेकायदेशीररित्या लिलाव करून व स्वतःचा आर्थिक फायदा करून आणि अनाधिकाराने फिर्यादीच्या मालकीचा माल आरोपी १६ ते १९ यांना दिला व संगनमताने गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे.
मा. न्यायालयातील आदेशावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोनि सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ खेडकर हे पुढील तपास करीत आहेत.