शिवप्रहार न्यूज-शिर्डी साईबाबाला ०२ कोटीचे सोने दान…
शिर्डी साईबाबाला ०२ कोटीचे सोने दान…
शिर्डी- हैद्राबाद येथील दानशुर साईभक्त पार्थसार्थ रेड्डी यांनी श्री साईबाबांच्या मुर्तीच्या खालील चौथ-या करीता सुमारे २ कोटी रुपये किंमतीचे ४ किलो सोने देणगी स्वरुपात दिले.
सदरची देणगी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्याकडे सुपूर्त केली. यावेळी मंदिर प्रमुख रमेश चौधरी उपस्थित होते.