शिवप्रहार न्यूज-श्रीरामपुरात आता 32 ऐवजी 34 नगरसेवक होणार;इच्छुकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग…

श्रीरामपुरात आता 32 ऐवजी 34 नगरसेवक होणार;इच्छुकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग…
श्रीरामपूर - नगर जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका असलेल्या श्रीरामपूर नगर पालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया शासकीय पातळीवर आता सुरू झालेली आहे. नवीन नियमानुसार श्रीरामपूर नगरपालिकेत 32 ऐवजी आता 34 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्यासंबंधीचा मंजुरी विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडून घेऊन पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे.
दोन नगरसेवकांचा एक प्रभाग असल्याची माहिती कळत असुन त्यानुसार लवकरच प्रभागाची रचना व राखीव भागांसंदर्भातील माहिती घोषित केली जाणार आहे.शहरातील इच्छुकांची गुडघ्याला बाशिंग बांधण्याची प्रक्रिया चालू झाली असून चांगल्या पक्षाकडून तिकीट मिळवण्यासाठी सेटिंगचे सर्व मार्ग त्यांनी तयार ठेवले आहे.
आपल्या शहरात अनेक तगडे उमेदवार इच्छुक असल्याने यावेळी नगरपालिकेला “काटे की टक्कर” अनेक भागात पाहायला मिळतील.तसेच काहीजण फक्त फॉर्म भरून मांडवली करण्यासाठी आतापासूनच “शो बाजी”करत आहे.दहा-पंधरा हजार खर्च करून दोन-चार लाख पदरात पाडून घेण्याकरिता अनेकांची फिल्डींग चालू झाली आहे.