शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर शहर व तालुक्यात दोघांचा मृत्यू…
श्रीरामपूर शहर व तालुक्यात दोघांचा मृत्यू…
श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरातील वा.नं.७, मोरगेवस्ती परिसरात बंडू तात्याबा काळे, वय - ४४ या इसमाने राहत्या घरातच गळफास घेतला. त्यांच्या नातेवाईकांनी बंडू काळे यास श्रीरामपूर शहरातील साखर कामगार रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी बंडू तात्याबा काळे हा इसम मयत झाल्याची खबर शहर पोलिसात दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बंडू काळे या इसमाने नेमका कोणत्या कारणाने गळफास घेतला? याचा पुढील तपास पोनि. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. जाधव हे करीत आहेत.
मयत बंडू काळे हे वायरिंगचे काम करायचे. ते विवाहीत असून त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, बहिण, भाऊ, वडील असा परिवार आहे. बंडू यांच्या अकस्मात मृत्यूने मोरगेवस्ती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दुसऱ्या घटनेत श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथील तरूण दत्तात्रय विलास पवार,वय-३५ वर्षे याला त्याच्या नातेवाईकांनी उपचारकामी श्रीरामपूर शहरातील संजीवन रूग्णालयात दाखल केले होते. तेथील डॉक्टरांनी तपासले असता दत्तात्रय विलास पवार या तरूणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झालेला होता. डॉक्टरांनी तशी खबर श्रीरामपूर तालुका पोलिसात दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून दत्तात्रय पवार या तरूणाचा नेमका कशाने मृत्यू झाला ? याचा पुढील तपास पोनि. खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ. बर्डे हे करीत आहेत.