शिवप्रहार न्युज - कोरोना रुग्णांना सेवा देतांना काळजी घ्या; मला काही होत नाही नाही असा फाजील आत्मविश्वास बाळगू नका-प्रांताधिकारी.

शिवप्रहार न्युज - कोरोना रुग्णांना सेवा देतांना काळजी घ्या; मला काही होत नाही नाही असा फाजील आत्मविश्वास बाळगू नका-प्रांताधिकारी.

शिवप्रहार न्युज -
कोरोना रुग्णांना सेवा देतांना काळजी घ्या; मला काही होत नाही नाही असा फाजील आत्मविश्वास बाळगू नका-प्रांताधिकारी.


बेलापूर:-
(दिलीप दायमा- प्रतिनिधी  )- कोरोना काळाची गरज ओळखुन बेलापुर ग्रामपंचायतीने विनामुल्य कोविड सेंटर सुरु केले. तसेच अल्पदरात आणखीही एक सेंटर सुरु झालेले आहे. त्या बद्दल बेलापुरकर निश्चितच कौतुकास पात्र आहेत असे गौरवाद्गार उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी  काढले . बेलापुर येथील वरद गजानन कोविड केअर सेंटर ,बेलापुर ग्रामपंचायत व ग्रामस्थ  यांच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या बेलापूर कोविड सेंटर या दोनही कोवीड सेंटरला श्रीरामपुरचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी भेट देवुन समाधान व्यक्त केले. या वेळी उपविभागीय अधिकारी अनिल पवार म्हणाले की,कोवीड रुग्णांच्या नातेवाईकांना विलगीकरण  कक्षात ठेवणे गरजेचे आहे असे केल्याने कोरोनाचा प्रसार कमी प्रमाणात होईल. 
          तसेच संस्कृती मंगल कार्यालय येथे सुरु असलेल्या वरद गजानन कोवीड केअर सेंटर येथेही उपविभागीय अधिकारी अनिल पवार तसेच श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी भेट दिली. या वेळी मंगल कार्यालयाची जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल शासनाच्या वतीने माजी सरपंच व मंगल कार्यालयाचे मालक भरत साळुंके व रत्नेश राठी यांना धन्यवाद दिले. तसेच बेलापुर ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने मराठी शाळेत सुरु केलेल्या कोविड सेंटरला देखील त्यांनी भेट दिली व रुग्णांना मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्या बद्दल समाधान व्यक्त केले. या वेळी रुग्णाजवळ जाताना खबरदारी बाळगा “मला काही होत नाही” असा फाजील आत्मविश्वास बाळगु नका मास्क व सँनिटायझरचा वेळोवेळी वापर करा रुग्णांना चहा,नाश्ता,जेवण देतांना विशेष काळजी घ्या दोन्ही सेंटरला असलेल्या डाँक्टरांचेही त्यांनी विशेष आभार मानले. गावाने पुढाकार घेवुन गावातच दोन कोवीड सेंटर सुरु केल्यामुळे तालुक्यातील यंत्रणेवर येणारा ताण बराचसा कमी होईल असा विश्वासही उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी व्यक्त केला. या वेळी वरद गजानन कोवीड सेंटर येथे भरत साळुंके ,रविंद्र खटोड, राम पोळ ,अशोक पवार ,अनिल पवार, प्रसाद खरात ,डाँ शैलेश पवार ,डाँ राशिनकर ,दिनेश मोडके ,सुभाष मोहीते तर बेलापुर ग्रामपंचायतीने सुरु केलेल्या कोविड सेंटर येथे जि प सदस्य शरद नवले ,उपसरपंच अभिषेक खंडागळे ,मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी ,पोलीस पाटील अशोक प्रधान ,डाँ. देविदास चोखर ,विशाल आंबेकर सचिन वाघ ,महेश कुर्हे  ,गोपी दाणी ,रफीक शेख ,सुनिल साळुंके ,मिलींद दुधाळ आदि उपस्थित होते