शिवप्रहार न्यूज- बेलापुरातील नंदी महिला भाविकेने चमच्याने पाजलेले दूध गटागट पितोय;ग्रामस्थांनी केली गर्दी…
बेलापुरातील नंदी महिला भाविकेने चमच्याने पाजलेले दूध गटागट पितोय;ग्रामस्थांनी केली गर्दी…
बेलापूर - ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बेलापूर या गावामध्ये आज सायंकाळच्या सुमारास कमला नेहरू वसतीगृहा शेजारील मुंजोबा मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडी सोबत असलेला नंदी एका महिला भाविकाच्या हाताने दूध पित असल्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,एका फुलपात्र्यामध्ये भरलेले दूध चमच्याच्या साहाय्याने ही महिला भाविक या मंदिरातील शिवपिंडी च्या जवळील नंदीला पाजत असताना हा नंदी चमचातील दूध एका झटक्यात संपवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे.
हा प्रसंग पाहण्यासाठी मुंजोबा मंदिरामध्ये अनेक महिलांसह ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे.