शिवप्रहार न्यूज- मुलींच्या शाळेत अफवांचा सुळसुळाट कोण म्हणतं नस कापली,कोण म्हणतं भूत आहे तर मास्तर म्हणतो-कोणाला काही सांगू नका…
मुलींच्या शाळेत अफवांचा सुळसुळाट कोण म्हणतं नस कापली,कोण म्हणतं भूत आहे तर मास्तर म्हणतो-कोणाला काही सांगू नका…
श्रीरामपूर -श्रीरामपूर शहरातील एका प्रसिद्ध मुलींच्या शाळेमध्ये अफवांचा सुळसुळाट पसरला असल्याची चर्चा गेल्या दोन -तीन दिवसापासून शहरात चालू आहे.या अफवा/चर्चा मध्ये शाळेतील एका बाथरूम मध्ये त्याच शाळेतील विद्यार्थिनीने नस कापल्याची अफवा /चर्चा तसेच शाळेतील एका बंद वर्गात भूत असल्याची चर्चा व एका मुलीने आत्महत्या केल्याची अफवा अशा प्रकारच्या अफवांचा प्रचंड सुळसुळाट गेल्या दोन ते तीन दिवसापासून चालू आहे.
या प्रकाराबाबत “शिवप्रहार न्यूज टीमने”नमुद शाळेत जाऊन मुख्यध्यापिकांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की ,एक खोली गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून तेथे भूत असल्याची अफवा काहीजण पसरवतात.तसेच या टीमने या प्रकाराबाबत वार्ड नंबर सात भागातील बजरंगनगर व मोरगे वस्ती मधील याच शाळेत जाणाऱ्या आठवी ते दहावीच्या काही विद्यार्थिनींच्या पालकांसोबत चर्चा केली असता या पालकांना देखील त्यांच्या मुलींकडुन या गोष्टीला दुजोरा मिळाला व शिक्षकांनी याबाबत मुलींना बाहेर कोणाला काही सांगू नका असे सांगितल्याचे कळवले.
त्यामुळे नेमका हा प्रकार काय आहे? याबाबत श्रीरामपूर शहर पोलिसांनी त्याची सत्यता पडताळणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा या अफवा/चर्चा सत्य नसतील तर विनाकारण या पालकांमध्ये-विद्यार्थीनींमध्ये भीतीचे वातावरण कायम राहील.