शिवप्रहार न्यूज- विदेशी कंपनीच्या दडपशाहीमुळे धरणे आंदोलनाचे रूपांतर आमरण उपोषणात;आंदोलनाचा मांडव हलवला…

शिवप्रहार न्यूज- विदेशी कंपनीच्या दडपशाहीमुळे धरणे आंदोलनाचे रूपांतर आमरण उपोषणात;आंदोलनाचा मांडव हलवला…

विदेशी कंपनीच्या दडपशाहीमुळे धरणे आंदोलनाचे रूपांतर आमरण उपोषणात;आंदोलनाचा मांडव हलवला…

श्रीरामपूर- श्रीरामपूर परिसरातील पूर्वीची प्रभात डेअरी व आताची लेक्टॅलीस -सन फ्रेश ऍग्रो कंपनी येथील कामगारांना दिवाळीत पगार न दिल्याने,बोनस न दिल्याने व पगारवाढ न करता स्थानिक कामगारांना डावलले म्हणून शेकडो कामगारांच्या वतीने “शिवप्रहार प्रतिष्ठान” च्या नेतृत्वाखाली दिनांक 26 ऑक्टोबर 2022 रोजी पासून धरणे आंदोलन सुरू आहे.कंपनीच्या काही हुकूमशाही प्रवृत्तीच्या लोकांकडून हे आंदोलन चिराडण्यासाठी सगळ्या मार्गाने प्रयत्न चालू आहे.

      आज आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आंदोलकांचा मांडव ज्या दुसर्या खाजगी कंपनीच्या समोर उभारण्यात आला होता.त्या खाजगी कंपनीच्या मालकाला दडपशाही करून तिथून मांडव काढण्यास भाग पाडण्यात आले.त्यामुळे आंदोलकांनी देखील मांडव प्रभात डेअरीसमोर आणून तेथे आंदोलनाला सुरुवात केली आहे.तसेच विदेशी कंपनीचे मुजोर प्रशासन हे कामगारांच्या रास्त मागण्यायासंदर्भात ०३ दिवसात कामागारांसोबत चर्चा करायला देखील तयार नसल्याने आज शुक्रवारी २८ ऑक्टोबर पासून या धरणे आंदोलनाचे रूपांतर “आमरण उपोषण”मध्ये करण्यात आल्याचे कामगार बांधव-भगिनींच्या वतीने सांगण्यात आले.

        त्यामुळे या आमरण उपोषण दरम्यान जर एखाद्या कामगाराच्या जीवाचे बरे-वाईट झाले.तर त्याची सर्वस्वी जबाबदारी कंपनीचे सर्व वरिष्ठ अधिकारी, मॅनेजर,HR मॅनेजर व संबंधित सर्वांची राहील असे कामगारांनी सांगितले आहे.त्याबाबत त्यांनी कंपनीला तसेच सरकारी यंत्रणांना देखील पत्रव्यवहार केला आहे.तरी कंपनीने जर कामगारांच्या मागणीबाबत लवकर तोडगा काढला नाही तर आंदोलन आणखी चिघळण्यास विदेशी कंपनीचे मुर्दाड देशी प्रशासन जबाबदार म्हणायचे का? दरम्यान कामगारांच्या या आंदोलनाला अनेक संघटना,पक्ष व खंडाळा,

रांजणखोल,टिळकनगर,दत्तनगर येथील अनेक ग्रामस्थांनी देखील पाठिंबा दिला आहे.