शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात चोरट्यांनी लोखंडी पलंग, लोखंडी मांडणी देखील चोरून नेली; लॅाकडाऊन चे गंभीर परिणाम समोर

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात चोरट्यांनी लोखंडी पलंग, लोखंडी मांडणी देखील चोरून नेली; लॅाकडाऊन चे गंभीर परिणाम समोर

श्रीरामपुरात चोरट्यांनी लोखंडी पलंग, लोखंडी मांडणी देखील चोरून नेली; लॅाकडाऊन चे गंभीर परिणाम समोर...

 श्रीरामपूर- लॅाकडाऊन मुळे कामधंदा गेल्याने अनेकांचे खाण्यापिण्याचे वांदे झाले आहे. अशा परिस्थितीत काही लोकांनी  चोरीच्या मार्गाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये चोरटे जी मिळेल ती किमती वस्तू चोरून नेत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.
               श्रीरामपूर शहरातील रहिवासी श्रीमती मीराबाई संजय साबळे,व्यवसाय-मोलमजुरी,राहणार- नवी दिल्ली,वार्ड नंबर 2,श्रीरामपूर यांच्या राहत्या घरी घरातील वेगवेगळे घरगुती वापराचे सामान, स्वयंपाक घरातील स्टीलची मांडणी, लोखंडी पलंग तसेच घरगुती वापराचे भांडे असा जवळपास दहा हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला म्हणून काल श्रीमती मिराबाई साबळे यांनी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 290/ 2021 भादवि कलम 461,380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री.जाधव हे करीत आहेत.
            सौ. साबळे या मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. सर्वसामान्य गरीब कुटुंब असलेल्या साबळेंच्या घरी चोरी झाल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशाप्रकारे लॉक डाऊन चा फटका चोरट्यांकडून गोरगरिबांनाच दिला जात आहे. जर यापुढे लॉकडाउन सरकारने असेच चालू ठेवले तर चोऱ्यामाऱ्या करणारे नवीन चोट्टे गोरगरिबांचे असेच नुकसान करत राहतील यात शंका नाही.