शिवप्रहार न्यूज- भोकर जवळ अपघातात दोन तरुण जागीच ठार उभ्या ऊस ट्रकला दुचाकी धडकली!
भोकर जवळ अपघातात दोन तरुण जागीच ठार
उभ्या ऊस ट्रकला दुचाकी धडकली!
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर -नेवासा रोडवर भोकर फाटया जवळ सबस्टेशन पासून काही अंतरावर रस्त्यात उभ्या असलेल्या ऊसाच्या ट्रकला दुचाकी पाठीमागून धडकून झालेल्या भिषाण अपघातात 2 तरुण जागीच ठार झाले. मयतात गणेश राजु ससाणे वय-२० वर्षे रा.वार्ड नं.३ श्रीरामपूर व योगेश अशोक यादव वय-२१ वर्षे रा.मुकुंदनगर नेवासाफाटा ता.नेवासा हे ठार झाले असून ऊसाचा ट्रक रस्त्यातच उभा होता. त्याला काही लाईट वगैरे नव्हते दुचाकी चालकाला अंधारात अचानक उभा ट्रक आल्याने त्याला होण्डा दुचाकी धडकून 2 तरुणांचा ट्रकच्या चालकाने रस्त्यातच ट्रक बेजबाबदारपणे उभा केल्याने आपला जीव गमवावा लागला. आज बुधवारी रात्री ८ चे सुमारास हा भिषाण अपघात झाला. तालुक पोलीस तातडीने घटना स्थळी पोहचले.
दरम्यान अपघातानंतर या तरुणांना साखर कामगार रुग्णालय येथे दाखल केले. रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर रवींद्र जगधने यांच्याशी संपर्क साधला असता हे तरुण उपचारापूर्वीच मयत झाले असल्याचे सांगितले.