शिवप्रहार न्यूज- पोलिसांनी 80 लाखांचा गांजा व 10 लाखाचा गुटखा पकडला...

पोलिसांनी 80 लाखांचा गांजा व 10 लाखाचा गुटखा पकडला...
नगर - नगर शहरातील विविध ठिकाणी छापे टाकून स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल दहा लाख रुपये किमतीचा वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा ,पान ,मसाला, तंबाखू ,मावा व हे साहित्य तयार करणारे इलेक्ट्रिक मशीन जप्त केले आहे. याप्रकरणी शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात एकूण 19 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
तसेच लोणी पोलीस स्टेशन अंतर्गत चंद्रापूर गावांमध्ये लोणी पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 80 लाख रुपये किमतीचा 510 किलो गांजा पिकअप गाडीसह जप्त केला आहे.याप्रकरणी दोन आरोपींना लोणी पोलिसांनी अटक केली आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा पकडल्याने खळबळ माजली आहे.