शिवप्रहार न्यूज- बेलापूरच्या अल्पवयीन हिंदू मुलीला पळवून नेणाऱ्या आयुब शेखवर कारवाई कधी करणार...

शिवप्रहार न्यूज- बेलापूरच्या अल्पवयीन हिंदू मुलीला पळवून नेणाऱ्या आयुब शेखवर कारवाई कधी करणार...

बेलापूरच्या अल्पवयीन हिंदू मुलीला पळवून नेणाऱ्या आयुब शेखवर कारवाई कधी करणार...

 श्रीरामपूर - बेलापूर गावातील एका 14 वर्षीय अल्पवयीन हिंदू मुलीला दिनांक 23 जुलै 2021 रोजी बेलापूर गावातच राहणाऱ्या आयुब सिकंदर शेख या तरुणाने पळवून नेले आहे.श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         परंतु हा गुन्हा दाखल करताना आरोपी आयुब सिकंदर शेख याने अल्पवयीन मुलीला पळवून नेलेले असतानाही त्याचे नाव अद्यापपर्यंत या गुन्हयामध्ये आरोपी म्हणून घेण्यात आलेले नाही. तसेच ही चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी हिंदू समाजाची असून आरोपी आयुब सिकंदर शेख याने तिच्यासोबत लव्ह जिहाद यासारखा प्रकार केल्याचे दिसत आहे. 

        त्यामुळे आज दि.०३ ॲागस्ट रोजी “शिवप्रहार प्रतिष्ठान” च्या वतीने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.सानप साहेब यांना सदर हिंदू मुलीचा लवकरात लवकर शोधून शोध घ्यावा व तिला पळून नेणार्या आरोपी आयुब सिकंदर शेख याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

        तसेच हा गुन्हा दाखल होवुन ११ दिवस झाले आहे.तरी या चौदा वर्षे वयाच्या अल्पवयीन हिंदु मुलीचा लवकरात लवकर शोध घेतला नाही तर हिंदू समाजाकडून मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशारा देखील "शिवप्रहार प्रतिष्ठानच्या" वतीने देण्यात आला आहे.

      यावेळी शिवप्रहार प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर(चंदु) आगे यांच्यासह उमेश शर्मा,प्रशांत भोसले,अतुल खाडे,दीपक संत,राहुल अस्वले, गणेश माळवे, योगेश सोनार,सागर बाजारे,संतोष चव्हाण,प्रतीक देशमुख इत्यादी मावळे व पिडीत मुलीचे नातेवाईक देखील उपस्थित होते.