शिवप्रहार न्यूज- कोर्टातून पळण्याचा श्रीरामपूरच्या आरोपींचा प्रयत्न अपयशी…
कोर्टातून पळण्याचा श्रीरामपूरच्या आरोपींचा प्रयत्न अपयशी…
राहता -राहता तालुक्यातील लोणी पोलिसांनी श्रीरामपूर येथे राहणारे नागेश काळे व योगेश पाटेकर यांना रस्ता लूट प्रकरणात अटक करून काल राहता न्यायालयात हजर केले होते.
यावेळी कुटुंबीयांना भेटण्याच्या निमित्ताने या दोन्ही आरोपींनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.परंतु लोणी पोलिसांनी तात्काळ त्यांना पकडले.त्यानंतर या आरोपींना संगमनेर येथील कारागृहात हलविण्यात आल्याचे समजते.