शिवप्रहार न्यूज-छत्रपती शिवाजी महाराज रोडवर धुडगूस घालणाऱ्या धर्मांधांवर गुन्हा दाखल;शिवप्रहारच्या प्रमुख मावळ्यांना विनाकारण डांबून ठेवले

छत्रपती शिवाजी महाराज रोडवर धुडगूस घालणाऱ्या धर्मांधांवर गुन्हा दाखल;शिवप्रहारच्या प्रमुख मावळ्यांना विनाकारण डांबून ठेवले...

श्रीरामपूर - श्रीरामपुरात पैगंबर जयंतीनिमित्त गिरमे चौक जवळील सय्यद बाबा दर्गा येथे मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक वार्ड २ येथे संपली.या मिरवणुकीवरून परतताना वार्ड नंबर दोन मधून मोठा धर्मांधांचा जनसमुदाय छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये आला व तेथून या धर्मांधांनी धुडगुस घालण्याला सुरुवात केली. नगरपालिकेसमोर व तुळजाभवानी चौकामध्ये काही महिलांना देखील या गोंधळाचा त्रास सहन करावा लागला. त्यानंतर पोलिसांनी या धर्मांधांवर लाठीमार करून त्यांना पांगून दिले.

          या प्रकारामुळे व्यापारी वर्ग व हिंदू समाज भयभीत झाला. त्यामुळे त्यांनी शिवप्रहार प्रतिष्ठान व हिंदुत्ववादी तरुणांना संपर्क साधला.यानंतर शिवप्रहार चे प्रमुख मावळे व हिंदुत्ववादी नेते-तरुण शहर पोलीस स्टेशन येथे जमा झाले आणि त्या धर्मांधांवर वर कारवाई करण्याची मागणी करू लागले.

        यावेळी पोलीस प्रशासनाने काही राजकारण्यांच्या दबावाखाली धर्मांधांवर लवकर गुन्हा दाखल केला नाही.परंतु शिवप्रहार प्रतिष्ठान चे प्रमुख मावळे व हिंदुत्ववादी तरुणांना विनाकारण सकाळपासून रात्रीपर्यंत स्थानबद्ध करून ठेवले. यामुळे हिंदू समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.