शिवप्रहार न्यूज - चोरीस गेलेला मुद्देमाल ०६ तासांत दोन आरोपीतांसह हस्तगत केला;श्रीरामपुर शहर पोलीसांची कारवाई…

शिवप्रहार न्यूज - चोरीस गेलेला मुद्देमाल ०६ तासांत दोन आरोपीतांसह हस्तगत केला;श्रीरामपुर शहर पोलीसांची कारवाई…

चोरीस गेलेला मुद्देमाल ०६ तासांत दोन आरोपीतांसह हस्तगत केला;श्रीरामपुर शहर पोलीसांची कारवाई…

श्रीरामपूर- 

दिनांक १५/०२ / २०२३ रोजी फिर्यादी सुनिल गोपीनाथ ढौकचौरे ,वय ४६ वर्षे ,धंदा -खाजगी नोकरी ,रा. रांजणखोल ता. राहता जि.नगर यांनी फिर्यादी दिली की,दिनांक १४/०२/२०२३ रोजी प्रभात डेअरी कंपनीमध्ये मेंटेन्स वर्क शॉपमध्ये ठेवलेला खाली नमुद वर्णनाचा व किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. बाबत फिर्यादी यांनी फिर्याद दिल्याने श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला गुरनं. १५८ / २०२३ भादंवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल आहे. चोरी गेलेल्या मुद्देमालाचे वर्णन

१) ४३,४००/- रुपये किमतीचे ०७ स्टीलचे एस. एस. वाँल प्रत्येकी ६२००/- रुपये प्रमाणे

२) १३,५००/- रुपये किमतीचे एक स्टीलचा एस. एस. वाँल जु.वा. ३) १,६००/- रुपये किमतीचे अंदाजे १२ फुट लांबीचे काळ्या रंगाचे आवरण असलेले

अर्धा इंची जाडीची काँपर केबल जु.वा. एकुण.--५८,५००/- रुपये किमतीचा मुद्देमाल.

       सदर गुन्हयांतील अज्ञात आरोपींचा शोध घेणेकामी मा. पोलीस निरीक्षक श्री. हर्षवर्धन गवळी यांनी तपास पथक तसेच बीट अंमलदार यांना आदेश दिले. त्यानुसार पोलीसांनी सदर चोरीचा प्राधान्याने तपास करुन गोपनीय यंत्रणा व घटनास्थळावरील तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे खालील संशयीत इसम मिळुन आले-

१) जीवन सुभाष खरात, वय २७ वर्षे, रा. खिलारीवस्ती वार्ड नं. ६ श्रीरामपुर ता. श्रीरामपुर २) आदित्य मच्छिंद्र रगडे, वय १९ वर्षे रा. खिलारीवस्ती वार्ड नं. ६ श्रीरामपुर ता. श्रीरामपुर.

      वरनमुद संशयीत इसमांकडे गुन्हयांचे अनुषंगाने त्यांना विश्वासात घेवुन सखोल तपास केला असता त्यांनी वरनमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यावरुन पोलीसांनी वरनमुद दोन्ही आरोपीतांकडुन एकुण ५८,५००/- रुपयांचा गुन्हयांतील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.

       सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक, राकेश ओला साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक, स्वाती भोर मँडम, श्रीरामपुर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक श्री. हर्षवर्धन गवळी, सपोनि. व्ही. एम. पाटील, परि. पोउनि दादाभाई मगरे, परि. पोउनि. प्रदीप बोराडे, पोना / मच्छिंद्र शेलार, पोना/साईनाथ राशीनकर, पोना / रघुवीर कारखेले, पोकाँ. गौतम लगड, पोशि/रमीझराजा अत्तार, पोशि/ गणेश गावडे, पोशि/ बाळासाहेब गुंजाळ, पोशि/संभाजी खरात, पोशि/ मच्छिंद्र कातखडे पोशि/ गौरव दुर्गुळे यांनी केली असुन सदर दाखल गुन्हयांचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोना / साईनाथ राशीनकर हे करीत आहेत.