शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुर शहर पोलीसांची कामगिरी - रोड रॉबरी करणारे दोन चोरट्यांचा थरारक पाठलाग करत एक तासात जेरबंद.

शिवप्रहार न्यूज-  श्रीरामपुर शहर पोलीसांची कामगिरी - रोड रॉबरी करणारे दोन चोरट्यांचा थरारक पाठलाग करत एक तासात जेरबंद.

श्रीरामपुर शहर पोलीसांची कामगिरी - रोड रॉबरी करणारे दोन चोरट्यांचा थरारक पाठलाग करत एक तासात जेरबंद.

श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- ऐन दिवाळीत श्रीरामपुर तालुक्यातील मध्यमवर्गीय नागरिक हे त्यांचे दुचाकींवर दिवाळीची खरेदी करण्यासाठी श्रीरामपुर शहरात येत असतात, त्यात मागील सीटवर महिला या पर्स घेवुन बसलेल्या असतात, याचाच फायदा घेत चोरट्यांनी चालु दुचाकीवर मागे बसलेल्या महिलांचे हातातील पतं खेचण्याचा नवाच प्रकार सुरू केला. याबाबत माहिती मिळताच मा. पोलीस अधीक्षक, राकेश ओला, ना. अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, संदिप मिटके यांनी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे मा. पोलीस निरीक्षक, हर्षवर्धन गवळी यांना सदर गुन्ह्यातील गुन्हेगारांचा तात्काळ बंदोबस्त करण्याच्या सुचना दिल्या होत्या, त्यावरुन मा. पोलीस निरीक्षक यांनी श्रीरामपुर शहर तपास पथकाला तपासाचे आदेश दिले.

फिर्यादी नामे सविता रावसाहेब दळे वय ३८ धंदा शेती व किराणा दुकान रा.खडकवस्ती माळवडगाव ता. श्रीरामपूर यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली कि. त्या व त्यांचा मुलगा असे दि. २४/१०/२०२२ रोजी १५/५० वा. चे सुमारास धान्य मार्केटचे कमानीसमोर संगमनेर - नेवासा रोडवरुन त्यांचे मोटारसायकलवर जात असताना पाठीमागुन आलेल्या विना नंबरच्या लाल काळया रंगाच्या एचएफ डिलक्स मोतावरील दोन अनोळखी इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादीचे हातातील पर्समध्ये ठेवलेले १) ५०,०००/ रु.कि.चे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मुगळसूत्र जु.वा. किं.अं. २) २१,०००/- रु. रोख रक्कम त्यात ५०० रु.दराच्या ४० नोटा, १०० रु.दराच्या १० नोटा असे एकुण ७१,०००/- रु. किं.चा मुददेमाल ठेवलेली पर्स बळजबरीने ओढुन चोरुन नेली आहे. वगैरे न ची फिर्याद दिल्याने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. । ९६७ / २०२२ भा.द.वि. कलम ३९४.३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्हयाचे तपासकामी मा. पोलीस निरीक्षक श्री हर्षवर्धन गवळी यांचे नेतृत्वात व सुचनांनुसार श्रीरामपुर परिसरात तपास पथक हे सरकारी वाहन तसेच खाजगी दुचाकीवर मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेत असताना, मिळत्या जुळत्या वर्णनाचे दोन इसम हे लाल काळ्या रंगाचे एच एफ डिलक्स विनानंबर मोटरसायकलवर संशयितरित्या फिरताना मिळुन आले. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता. त्यांनी त्यांची दुचाकी भरधाव वेगाने गल्ली बोळातून पळवुन तेथून पळ काढला परंतु तपास पथकाने आपआपसात समन्वय साधत सिनेस्टाईल चित्तथरारक पाठलाग करत, दोन्ही बाजुंनी घेरले. त्यावेळी चोरट्यांनी पोलीस वाहनास कट मारुन पळुन जाण्याचे प्रयत्नात दोन्ही इसम त्यांचे दुचाकीचा अपघात होवुन खाली पडले. त्यावेळी त्यांनी दुचाकी जागीच सोडुन देत रोडचे कडेचे शेतात उंच वाढलेल्या गिन्नी गवतात पळुन जाण्याचा प्रयत्न केला परंतु तपास पदकाने पुन्हा त्यांचा पळुन पाठलाग करुन एक तासाच्या आत त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांना त्यांची ओळख विचारता त्यांनी त्यांचे नावे व पत्ते १) अरवाज मस्तान शेख, वय २० वर्षे, रा. फकिरवाडा, वॉर्ड नं. १. श्रीरामपुर, २) मशर्रफ रशिद शेख. वय २३ वर्ष. रा. सिद्धार्थ नगर, कब्रस्तान जवळ, वॉर्ड नं. १, श्रीरामपुर असे असल्याचे सांगुन गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना दाखल गुन्ह्यात अटक करुन त्यांचे कडे तपास केला असता त्यांचेकडुन सदर गुन्हयातील गेले मालापैकी १८.००/- रु.रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेली असुन त्यांनी तपासादरम्यान श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला दाखल असलेले गु.र.नं. ९५८ / २०२२ भा.द.वि. कलम ३९४ व तसेच । ९६५ / २०२२ भा.द.वि. कलम ३९४,३४ असे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यांचेकडुन खालीलप्रमाणे गुन्हयांचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे. १) श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. ९६७ / २०२२ भा.द.वि. कलम ३९४.३४ मधील गेले मालापैकी १,८००/- रु. रोख

२) श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. । ९५८ / २०२२ भा.द.वि. कलम ३९४ मधील गेले मालापैकी ३०,०००/- रु. कि.ची हिरो एच एफ डिलक्स मोटारसायकल. १०,०००/- रु. किं.चा विवो कंपनीचा मोबाईल, ३,०००/- रु. किं.चे चांदीचे ब्रासलेट १००/- रु. रोख ३) श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. । ९६५ / २०२२ भा.द.वि. कलम ३९४.३४ मधील गेले मालापैकी ४५,०००/- रु. किं.चे सोन्याचे

मिनांगंटण व २०,०००/- रु. रोख तसेच ५५,०००/- रु. किं.ची सदर गुन्हे करतेवेळी वापरलेली होंडा शाईन मोटारसायकल नं. एम एच १७ सौ क्यु ६९२९ असा एकुण १.६४,९००/- रु. इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात येवुन सदर गुन्हे उघडकीस आणले आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, राकेश ओला, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, स्वाती भोर. तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर उपविभाग, संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन, हर्षवर्धन गवळी यांचेकडील तपास पथकातील सपोनि जिवन बोरसे, पो.ना. कारखेले, पोना फुरकान शेख, पो. कॉ. राहुल नरवडे. पो. कॉ. रमिझराजा अत्तार, पो. कॉ. गणेश गावडे, पो. कॉ. गौरव दुर्गुळे, पो.कॉ. भारत तमनर व चालक पोहवा भारत जाधव यांनी केली असुन, दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी साो. यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि जिवन बोरसे हे करीत आहेत.