शिवप्रहार न्यूज- नेवासारोड वरील खड्डे मुरूम टाकून बुजवले;पीडब्ल्यूडीचा महापराक्रम .

नेवासारोड वरील खड्डे मुरूम टाकून बुजवले;पीडब्ल्यूडीचा महापराक्रम ...
श्रीरामपूर- श्रीरामपूर - नेवासा या राज्यमार्गावर कायम मोठमोठे खड्डे पडलेले असतात. तसेच आपरा रस्ता व खोल साईड कपारी यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना प्रचंड त्रास होतो .
जनसामान्यांनी मागणी केल्यानंतर राजकीय मंडळी “करुन घेवु” असे आश्वासनांचे पिल्लू सोडून देतात व नंतर या रस्त्याच्या प्रश्नाकडे पुन्हा लक्ष घालत नाही हे एक कटू सत्य आहे.
नुकतेच प्रहार पक्षाच्या आंदोलनानंतर या ठिकाणचे खड्डे बुजवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने चालू केले.परंतु हे खड्डे खडी-डांबराने न बुजवता खड्ड्यात मुरूम- माती टाकून ते बुजवण्याचे काम चालू आहे.
पीडब्ल्यूडी विभागाची एवढी दयनीय अवस्था आहे का की राज्य मार्गाचे(STATE HIGHWAY) खड्डे बुजविण्याचे काम मुरूम माती टाकून करावे लागत आहे अशी संतप्त भावना श्रीरामपूर तालुक्याच्या नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
पावसाळ्याचे दिवस असल्याने या मुरूम -मातीने खड्डे बुजवण्याच्या प्रकारामुळे आधीच दळभद्री असलेला हा रस्ता अजून भिकरचोट परिस्थितीत जाणार असल्याचे दिसत आहे.