शिवप्रहार न्यूज -अरबाज बागवान याने भोसले व पगारे यांच्या डोक्यात केले कोयत्याने वार; या गंभीर घटनेवरून श्रीरामपूर पोलीस ठाण्यात 307 दाखल

शिवप्रहार न्यूज -अरबाज बागवान याने भोसले व पगारे यांच्या डोक्यात केले कोयत्याने वार; या गंभीर घटनेवरून श्रीरामपूर पोलीस ठाण्यात 307 दाखल

अरबाज बागवान याने भोसले व पगारे यांच्या डोक्यात केले कोयत्याने वार; या गंभीर घटनेवरून श्रीरामपूर पोलीस ठाण्यात 307 दाखल...

श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 2 येथील नवी दिल्ली परिसरामध्ये मुजू कुरेशी यांच्या खोलीमध्ये मजुरीकाम करणारे अर्जुन कानिफनाथ भोसले,वय 25 हे त्यांच्या परिवारासह भाडेकरु म्हणून राहतात. 

        ते त्यांच्या घरात त्यांच्या परिवारासह असतांना त्याच भागात राहणारा आरोपी आरबाज उर्फ भैय्या इजाज बागवान हा त्यांच्या घरामध्ये घुसला व अर्जुन यांना “तू माझ्या नातेवाईकांसोबत वाद केले” असे म्हणून अरबाज याने त्याच्या हातातील कोयत्याने अर्जुन भोसले यांच्या डोक्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार केला.परंतु अर्जुन याने त्याचा डावा हात मध्ये घातल्यामुळे अरबाज याचा कोयत्याचा वार अर्जुन याच्या डाव्या हाताला लागून मोठी जखम झाली. त्यामुळे अर्जुन हा जोरात किंचाळला त्याचा किंचाळण्याचा आवाज ऐकून अर्जुन याचा मेहुणा सचिन मधुकर पगारे हा त्या ठिकाणी पळत पळत आला.

      त्यावेळी सचिन पगारे हा अर्जुन याला मारू नको असे आरबाजला समजून सांगत असताना अरबाज याने त्याच्या हातातील कोयत्याने सचिन पगारे याच्या देखील डोक्यावर वार केला. त्यामुळे सचिन पगारे हा देखील जोरात ओरडून कोसळला.त्या आवाजामुळे अर्जुन भोसले यांची पत्नी व बहीण या दोघी तेथे आल्या आणि त्यांनी अरबाज बागवान याला ढकलण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपी आरबाज याने कोणाचेही ऐकले नाही.

       उलट त्याने अर्जुन यांच्या पत्नीचा पोटात जोरात लाथ मारून तिला खाली पाडले. तेव्हा अर्जुन भोसले यांची सासू संगीता मधुकर पगारे या देखील त्या ठिकाणी आल्या असता अरबाज बागवान याने त्यांना सुद्धा घाण-घाण शिवीगाळ केली व आरोपी आरबाज बागवान त्या ठिकाणाहून पळून गेला.

        या घडलेल्या गंभीर घटनेवरून फिर्यादी अर्जुन कानिफनाथ भोसले,वय 25 वर्ष,धंदा -मजुरी याच्या तक्रारीवरून काल रात्री श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 349/ 2021 भादवि कलम 307 व इतर प्रमाणे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

       या गुन्ह्याच्या घटनास्थळी श्रीरामपूरचे डीवायएसपी श्री.संदीप मिटके व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.सानप यांनी तात्काळ भेट दिली. या गुन्ह्याचा पुढचा तपास पोलिस उपनिरीक्षक श्री.सुरवाडे हे करीत आहेत.