शिवप्रहार न्यूज - अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा व १४ गुन्हे दाखल असलेला रेकॅार्डवरील गुन्हेगार श्रीरामपूर शहर पोलीसांनी केला जेरबंद….
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा व १४ गुन्हे दाखल असलेला रेकॅार्डवरील गुन्हेगार श्रीरामपूर शहर पोलीसांनी केला जेरबंद….
श्रीरामपूर- दिनांक ०७/०२/२०२३ रोजी सकाळी ०८.३० वाजता श्रीरामपूर शहरातील एका अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावुन पळवुन नेले बाबत तिची आई हिने देलेल्या फिर्यादी वरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. १२७/२०२३ भा. द. वि. कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर अपहृत मुलीचा व आरोपी याचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक श्री हर्षवर्धन गवळी यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथील तपासपथकातील अंमलदार यांना आदेश दिल्याने त्यानुसार चक्रे फिरवत तपास पथकाने गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळवली की सदर अपह्युत मुलगी हिच्या घराजवळ राहणारा सराईत आरोपी मोसीन जावेद शेख ,वय २८ वर्ष हा देखील सदर गुन्हा घडले पासुन फरार झाला आहे.
त्याचा शोध घेतला असता तो नगर एम. आय. डी. सी मध्ये असल्याची बातमी मिळाल्याने तपास पथकातील कर्मचारी यांनी लागलीच नगर एम. आय. डी. सी मध्ये त्याचा शोध घेवुन सापळा रचुन शिताफतीने सदर आरोपी यास पथकाने ताब्यात घेवुन त्याचेकडे सदर गुन्ह्यातील अपहृत मुलगी हिच्या बाबत चौकशी केली असता त्याने सदर मुलगी हिचे अपहरण केल्याची कबुली देवुन तिस एका खोलीत ठेवल्याचे सांगीतल्याने लागलीच सदर मुलगी हिस ताब्यात घेवुन सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.या गुन्ह्यातील आरोपी मोहसीन जावेद शेख, वय २८ वर्षे रा. श्रीरामपूर याच्याविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे तब्बल १४ गुन्हे विविध कलमांन्वये दाखल आहेत.आरोपीला अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, राकेश ओला साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, स्वाती भोर, तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर उपविभाग, संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन, हर्षवर्धन गवळी यांचे आदेशाने तपास पथकातील सपोनि व्ही. एम. पाटील, पोहेकॉ. सोमनाथ गाडेकर पोना. अढागळे, पोना रघुवीर कारखोले, पो. कॉ. गौतम लगड, पो.कॉ. राहुल नरवडे, पो. कॉ. रमिझराजा अत्तार, पो. कॉ. गणेश गावडे, पो.कॉ. मच्छिंद्र कातखडे, पो. कॉ. गौरव दुर्गुळे, पोकॉ. क्षिरसागर, पोकॉ. दरेकर, तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील पो.ना. फुरकान शेख व प्रमोद जाधव यांनी केली असून, दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक श्री हर्षवर्धन गवळी सो यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. व्ही. एम. पाटील हे करीत आहेत.