शिवप्रहार न्युज - “मासिक माहिती व कायदा”चे पत्रकारिता क्षेत्रात भविष्यात मोठे नाव होणार - ज्येष्ठ पत्रकार मनोजकुमार आगे…

शिवप्रहार न्युज - “मासिक माहिती व कायदा”चे पत्रकारिता क्षेत्रात भविष्यात मोठे नाव होणार - ज्येष्ठ पत्रकार मनोजकुमार आगे…

“मासिक माहिती व कायदा”चे पत्रकारिता क्षेत्रात भविष्यात मोठे नाव होणार - ज्येष्ठ पत्रकार मनोजकुमार आगे…

श्रीरामपूर प्रतिनिधी:

माहिती व कायदा या नावात खूप ताकद असून योग्य परिश्रम घेतल्यास मासिक माहिती व कायदा हे वर्तमानपत्र भविष्यात फार मोठे होऊ शकते. त्यासाठी मासिक माहिती व कायदा संपादकीय मंडळाने अधिक परिश्रम घेणे आवश्यक तथा गरजेचे असल्याचे दैनिक जयबाबा चे कार्यकारी संपादक, ज्येष्ठ पत्रकार मनोजकुमार आगे यावेळी आयोजित कार्यक्रमात म्हणाले.

      श्रीरामपूर येथील संगमनेर रोडवरील व्हीआयपी रेस्ट हाऊस सभागृहात ज्येष्ठ पत्रकार असलमभाई सय्यद संपादित मासिक माहिती व कायदा या वर्तमानपत्राच्या ११ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्ष पदावरुन बोलत होते. 

      सध्या शोधक पत्रकारितेचे गरज असून पत्रकारिता हे सामाजिक क्रांतीचे हत्यार असल्यामुळे पत्रकारांनी जनतेच्या प्रश्नांना आपल्या वर्तमानपत्र्याच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करावा असे ते म्हणाले.

दिनांक १० डिसेंबर रोजी श्रीरामपूर शहरात मासिक माहिती व कायदा या वर्तमानपत्राचा ११ वा वर्धापन दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगीसामाजिक,राजकीय,पत्रकारिता आदि क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मान्यवारांच्या सत्कार सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी दैनिक जयबाबाचे कार्य,संपादक ज्येष्ठ पत्रकार मनोजकुमार आगे हे होते.

पुढे बोलताना श्री.आगे म्हणाले की, पत्रकारिता म्हणजे दुधारी तलवार असते,पत्रकारांनी नेहमी निरपेक्षपणे कामे केली पाहिजे.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास राज्यघटनेद्वारे दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारामुळे आपण पत्रकारितेच्या माध्यमातून आपले विचार निर्भीडपणे मांडू शकतो. माहिती व कायदा या नावात खूप ताकद असून योग्य परिश्रम घेतल्यास “मासिक माहिती व कायदा” हे वृत्तपत्र भविष्यात मोठे नांव लौकिक मिळवेल.याकरीता मासिक माहिती व कायदा संपादकीय मंडळाने अधिक परिश्रम घेणे आवश्यक तथा गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

त्यासोबतच सध्या शोधक पत्रकारितेचे गरज असून पत्रकारिता हे सामाजिक सुधारण्याचे हत्यार असल्यामुळे पत्रकारांनी जनतेच्या प्रश्नांना वर्तमानपत्रांच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करावा असेही ते म्हणाले.

    याप्रसंगी राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षाताई रुपवते म्हणाल्या की, छोटया वर्तमानपत्राच्या पत्रकारांना प्रोत्साहन देण्याचे काम मोठया वृत्तपत्राचे ज्येष्ठ संपादक व ज्येष्ठ पत्रकार करत आहेत ही अभिमानाची बाब असून ते फक्त श्रीरामपूर शहरातच होऊ शकते असे गौरोवोदगार त्यांनी याप्रसंगी काढले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, वृत्तपत्रानी महिलांच्या न्याय व अधिकाराबाबत तसेच महिला विषयी कायदेविषयक प्रबोधन करावे जेणे करून महिलांना आपल्या हक्क व अधिकारांची जाणीव होईल असेही त्या म्हणाल्या.

      याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार नागेशभाई सावंत म्हणाले की, पत्रकारांनी सत्याची बाजू सोडू नये समाजासमोर सत्य पोहचवणे हे पत्रकारांचे आद्य कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे सध्याच्या युगात छोटया वृत्तपत्राची अवस्था खुपच दययनीय असून समाजाने छोट्या वर्तमानपत्राचे वार्षिक वर्गणीदार होऊन छोटया वर्तमानपत्रांना आर्थिक हातभार लावणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

या वर्धापनदिनमित्त रिपाई चे विभाग प्रमुख भिमराज बागुल म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले असून पत्रकार बांधव समाजातील वंचित शोषित घटकावर होणाऱ्या अन्यायास वाचा फोडण्याचे काम करत असतात,सातत्याने आपल्या लेखणीद्वारे उपेक्षित घटकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्याची मोठी जबाबदारी पत्रकारांवर असते असे ते म्हणाले.

     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन यांनी केले.

मासिक माहिती व कायदा वर्धापन दिनी ज्येष्ठ पत्रकार मनोजकुमार आगे यांना स्व.वसंतराव देशमुख पुरस्कार, महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षांताई रूपवते यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुरस्कार तसेच दत्तनगर ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सदस्या सौ. शालिनीताई मगर, रिपाई चे विभागप्रमुख भिमराज बागुल,रिपाईचे कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन,सर्प मैत्रीण सौ. राजश्री अल्हाट - अमोलिक, भिमशक्ती चे संदीप मगर यांना पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य याबाबत मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

    यानिमित्त रिपाई चे कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी कविता सादरीकरण करून सर्वांना मंत्रमुग्ध केले, त्याचप्रमाणे बालशाहीर कु.ओवी प्रसाद काळे हिने गायलेल्या भिम पोवाडा नें उपस्थितीत मान्यवरांची मने जिंकली.

मासिक माहिती व कायदा वर्तमानपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी समता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख, रिपाईचे जिल्हा विभाग प्रमुख भीमराज बागुल, महिला आयोग सदस्या उत्कर्षांताई रुपवते, रिपाई चे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन,भीमशक्ती चे संदीप मगर, वंचितचे चरणदादा त्रिभुवन,आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड, दै.जयबाबाचे कार्य. संपादक मनोजकुमार आगे,ज्येष्ठ पत्रकार नागेशभाई सावंत, भीमशक्ती चे अंबादास निकाळजे, अरुण खंडिझोड, शालिनीताई मगर, विद्याताई क्षीरसागर, अ.भा.लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हनीफभाई पठाण, भिमशक्तीचे जिल्हाउपाध्यक्ष अनिल गायकवाड ,विद्याताई क्षिरसागर, साप्ताहिक मेमन रिपोर्टर चे संपादक अफजल मेमन आदी मान्यवर तसेच मासिक माहिती व कायदा चे प्रतिनिधी पत्रकार रहिमखान पठाण,जावेद सय्यद,शाबान तांबोळी,तनवीर शेख, दीपक कदम,अनिल गांगुर्डे,अशोक शेलार, राहुल विसपुते,अमोल सोनवणे, सनी बारसे,यासिन सय्यद, शहाबाज पठाण,इनायत अत्तार,,योगेश जगताप,एजाज सय्यद, मनोज गायकवाड, गणेश शेवाळे चंद्रकांत येवले,सतिश गायकवाड,सलिम शेख, फय्याज पटेल, वंदनाताई गायकवाड, जयश्री पवार, कल्पना तेलोरे, सुनिता भाकरे आदी राजकीय, सामाजिक, पत्रकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

   मासिक माहिती व कायदा च्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थिती मान्यवारंचे कार्यक्रचे आयोजक माहिती व कायदा चे कार्यकारी संपादक अमन सय्यद, उपसंपादिका विजयाताई बारसे, शहानवाज सय्यद यांनी आभार मानले.या कार्यक्रमासाठी अंबादास निकाळजे, सुनिल संसारे, अरुण खंडिझोड, प्रशांत भोसले, सोमनाथ पटाईत, विश्वनाथ नरोडे, कामरान शेख, कुणाल वाव्हळ, संतोष मगर, बापु विधाटे, प्रमोद जाधव, सचिन राठोड, नितीन त्रिभुवन, आकाश जाधव, सचिन कोतकर, संदिप अमोलिक,अनिकेत सगळगिळे, अनिल बोधक, विलास जाधव, मुसा शेख, सागर पटारे, अमोल गायकवाड, ॲड. अजय साळवे, सतिश जाधव, विजय चव्हाण आदींनी विशेष परिश्रम घेतले.