शिवप्रहार न्यूज- अशोक कारखान्याच्या वतीने १०० बेडचे कोवीड सेंटर सुरु ; प्रांत अधिकारी यांनी केले उद्घाटन...

शिवप्रहार न्यूज- अशोक कारखान्याच्या वतीने १०० बेडचे कोवीड सेंटर सुरु ; प्रांत अधिकारी यांनी केले उद्घाटन...

अशोक कारखान्याच्या वतीने १०० बेडचे कोवीड सेंटर सुरु ; प्रांत अधिकारी यांनी केले उद्घाटन...

श्रीरामपूर -

तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या वतीने माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोकनगर येथील अशोक पॉलिटेक्निक कॉलेजच्या मुलांच्या वसतिगृहामध्ये 100 बेडचे कोविड केअर सेंटर आज महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आले. 

           या कोविड सेंटरचा शुभारंभ प्रांताधिकारी अनिल पवार यांचे हस्ते तसेच माजी आमदार भानुदास मुरकुटे, तहसीलदार प्रशांत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन शिंदे, डॉ.रविंद्र कुटे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या उद्घाटन प्रसंगी चेअरमन भाऊसाहेब कहांडळ, व्हा.चेअरमन पोपटराव जाधव, माजी चेअरमन सोपानराव राऊत, माजी सभापती प्रा.सौ.सुनिताताई गायकवाड, रोहन डावखर, निरज मुरकुटे, व्यापारी असोसिएशनचे संचालक अमोल कोलते, कार्यकारी संचालक देवराव लोकरे, कारखान्याचे मेडिकल ऑफिसर डॉ.मंगेश उंडे, डॉ.वैभव उंडे, डॉ.कल्याणी झाडे, डॉ.शामल उंडे, कार्यालय अधिक्षक आप्पासाहेब दुशिंग, फायनान्स मॅनेजर निलेश गाडे, सिव्हील इंजिनिअर कृष्णकांत सोनटक्के, लेबर ऑफिसर अण्णासाहेब वाकडे, गॅरेज इनचार्ज रमेश आढाव, सॅनिटेशन इन्स्पेक्टर विलास लबडे, परिचारीका माया बारसे, कोमल दोंदे, अंकुश सातुरे, कोमल सातुरे आदी उपस्थित होते.

           या कोवीड सेंटरचा अशोकनगर पंचक्रोशीतील नागरिकांना फायदा होणार आहें