शिवप्रहार न्यूज- OBC राजकीय आरक्षणावरुन BJP चे श्रीरामपुरात लाक्षणिक उपोषण…

OBC राजकीय आरक्षणावरुन BJP चे श्रीरामपुरात लाक्षणिक उपोषण…
श्रीरामपूर -महाविकास आघाडी सरकारनेओबीसींचे राजकीय आरक्षण घालवले . ओबीसी समाजावर अन्याय केला या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा ने आज महाराष्ट्रभर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले . त्याचाच एक भाग म्हणून श्रीरामपूरात महात्मा गांधी चौकात लाक्षणीक उपोषण झाले .या उपोषणाला मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते .
या उपोषणाचे नेतृत्व भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेशाचे उपाध्यक्ष प्रकाश चित्ते , नगरसेवक किरण लूनिया , माजी शहराध्यक्ष संजयजी पांडे , कामगार आघाडीचे प्रदेशाची उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण ,अभिजीत कुलकर्णी ,ओबीसी मोर्चा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पुष्पाताई हरदास ,ओबीसी मोर्चा सरचिटणीस अजय नानोर , उपाध्यक्ष सौ किरण सोनवणे ,महिला आघाडी तालुकाध्यक्ष सुप्रियाताई धुमाळ , सौ दिपाली चित्ते सौ मीरा वाघमारे , राजेंद्र पाटणी , सोमनाथ कदम ,संजय यादव , बाळासाहेब हिवराळे , संदीप वाघमारे , महेश विश्वकर्मा ,बबन जाधव ,गणेश भिसे , विजय लांडे ,रवींद्र चव्हाण , राजु पडोळकर ,कैलास शिंदे , अण्णासाहेब थोरात , संजय राऊत , लखन लोखंडे ,संजय रुपटक्के , गणेश खरात ,आदींनी या उपोषणाचे नेतृत्व केले केले .या उपोषणाला पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पटारे , मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे ,पंचायत समितीचे माजी सदस्य गणेश मुदगुले आदींनी भेटी देऊन उपोषणाला पाठिंबा दिला .
यावेळी बोलताना ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते म्हणाले की मध्यप्रदेश सरकारने चार महिन्यातील इंपरीकल डाटा देऊन ट्रिपल टेस्ट पूर्ण केली . आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मध्यप्रदेशातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत केले .या उलट महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने गेली दोन वर्षे घोळ घालून सर्वोच्च न्यायालयात एम्पिरिकल डाटा दिला नाही .आणि ठरवूनओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालविले व ओबीसी समाजावर अन्याय केला येणाऱ्या काळात ओबीस समाजाने आघाडीला सरकारला त्यांची जागा दाखवावी असे आवाहन श्री चित्ते यांनी या वेळी केले .
या लाक्षणिक उपोषणाला
रवींद्र चव्हाण ,दर्शन चव्हाण ,सागर मलिक ,विकी देशमुख ,गणेश परदेशी ,अक्षय गडेकर ,दत्ता पवार ,महेश चोरमले , संदीप साठे ,बाळासाहेब गाडेकर ,रमेश सातपुते , कृष्णा साळुंखे ,इम्रान बागवान ,विकी चव्हाण , सुनील इंगळे ,किरण कोळपकर ,पप्पू झिंजुर्डे अनिल पिटेकर ,गोविंद ढाकणे ,अशोक लोखंडे , बापू चितळकर ,प्रशांत लबडे ,आकाश शिंदे ,सुनील ताके , सागर उपळकर , मच्छिंद्र बहिरे शरद थोरात ,विजय गांगुर्डे , गणेश जायगुडे ,रोहिदास वाघ ,कार्तिक बकरे ,ऋत्विक कांबळे , श्रावण ठोकळ ,राहुल गायकवाड , जितेंद्र पवार , अशोक लोखंडे ,संजय वाघ ,प्रवीण शिंदे आदी अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .