शिवप्रहार न्यूज- दिवाळी गेली,भाऊबीज गेली,पगार नाही,वाढ-बोनस नाही,दिवाळीत पोराबाळांना कपडेनाही,गोडधोड नाही;कामगारांच्या न्याय-हक्कासाठी शिवप्रहारचे धरणे आंदोलन सुरू…

शिवप्रहार न्यूज-  दिवाळी गेली,भाऊबीज गेली,पगार नाही,वाढ-बोनस नाही,दिवाळीत पोराबाळांना कपडेनाही,गोडधोड नाही;कामगारांच्या न्याय-हक्कासाठी शिवप्रहारचे धरणे आंदोलन सुरू…

दिवाळी गेली,भाऊबीज गेली,

पगार नाही,वाढ-बोनस नाही,

दिवाळीत पोराबाळांना कपडे

नाही,गोडधोड नाही;कामगारांच्या न्याय-हक्कासाठी शिवप्रहारचे धरणे आंदोलन सुरू…

श्रीरामपूर -श्रीरामपूर परिसरातील सन फ्रेश ऍग्रो/लॅक्टेलीस पूर्वीची प्रभात डेअरी येथील कामगारांना पगार नाही, पगारवाढ नाही,बोनस नाही,तसेच स्थानिकांना डावलल्यामुळे कामगारांच्या न्याय-हक्कासाठी त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या याकरिता प्रभात डेअरी जवळ ,श्रीरामपूर येथे काल दिनांक 26 ऑक्टोबर 2022 रोजी पासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

      कामगारांच्या मागण्या अतिशय न्याय आहेत.परंतु विदेशी कंपनी लॅक्टेलीस तसेच येथील सनफ्रेश कंपनी यांनी कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे.हे कामगार वर्षभरापासुन न्याय मागत आहेत परंतु कंपनीने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत.तसेच शिवजयंती साजरी करण्यास मनाई करण्यात येऊन श्रीरामपूर व राहता तालुक्यातील अनेक स्थानिक कामगारांना कामावरून कमी देखील करण्यात आले आहे.याविरोधात कामगारांनी पंधरा दिवसांपूर्वी आंदोलन केले असता कंपनीचा मॅनेजर पाठक याने कामगारांवर खोटा गुन्हा दाखल करून घेतला.या गुन्ह्यातून जामीन करण्यासाठी आधीच रसातळाला आलेल्या कामगारांना व्याजाने पैसे घ्यावे लागले.

       तसेच दसरा-दिवाळी-भाऊबीज या सणात देखील कामगारांची उपासमार झाली.परिवारातील पोराबाळांना दिवाळी सणात काहीच घेता आले नाही.इतकी दयनीय अवस्था कामगारांची झाल्यामुळे “शिवप्रहार प्रतिष्ठान”च्या नेतृत्वाखाली कालपासून धरणे आंदोलन सुरु करण्यात आले.परंतू कामगारांचा इतका संवेदनशील जीवन-मरणाशी संबंधित विषय असताना शहर पोलीस ठाण्याचे एपीआय विठ्ठल पाटील यांच्या पथकातील सोमनाथ गाडेकर व कर्मचार्यांनी हे आंदोलन रात्रीच्या वेळी येऊन दडपण्याचा प्रयत्न केला व अतिशय असंवेदनशीलपणा एपीआय विठ्ठल पाटील यांनी दाखवला.दरम्यान या दडपशाहीच्या प्रकाराची माहिती पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला साहेब यांना समजताच त्यांनी गोरगरीब कामगारांवरील ही दडपशाही तात्काळ थांबवली. त्यामुळे आंदोलनकर्त्या कामगारांनी ओला साहेबांचे आभार मानले आहे.

      आज धरणे आंदोलनाचा दुसरा दिवस असून कामगारांच्या न्याय्य मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे कामगारांनी सांगितले आहे.एकीकडे सरकार म्हणते आम्ही “हिंदुत्ववादी सरकार” आहोत दुसरीकडे हिंदूंचाच सर्वात प्रमुख सण असलेल्या दिवाळीत कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.दुर्दैव हे आहे की कामगारांच्या या भावना या हिंदुत्ववादी सरकारपर्यंत कधी पोहोचणार!!!

      तरी विदेशी कंपनी व प्रशासनाकडून कामगारांवर प्रचंड अन्याय होत असल्यामुळे शिवप्रहार प्रतिष्ठानचे मावळे कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.कारण छत्रपती शिवाजी महाराज असो वा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो ते कायम गोरगरीब मजूर-कामगारांच्या पाठीशी उभे राहून त्यांना न्याय देत होते. 

      या कंपनीच्या बनवा-बनवी व नियमबाह्य कामाचा अन्न व औषध प्रशासनाने २० दिवसांपूर्वी बेकायदा गोण्यांचा साठा पकडून पर्दाफाश केला होता.तो कोट्यावधी रुपयांचा साठा अजुन सिल आहे. तर दुसरीकडे कामगारांना द्यायला पैशे नाही म्हणता.कंपनी व्यवस्थापन कामगारांवर मनमानी व पैशाचा वापर करुन दडपशाही करत आहे .