शिवप्रहार न्यूज-श्रीरामपुरात अवैध कत्तलखान्यावर छापा 6,26,000 ₹ चा मुद्देमाल जप्त;Dysp मिटकेंची कारवाई…

श्रीरामपुरात अवैध कत्तलखान्यावर छापा 6,26,000 ₹ चा मुद्देमाल जप्त;Dysp मिटकेंची कारवाई…
(श्रीरामपुर प्रतिनिधी): आज दि. 07/06/2022 रोजी Dysp संदीप मिटके यांना श्रीरामपूर शहरातील शहरातील वॉर्ड नंबर 2 येथे गो वंशीय जनावरांची अवैध कत्तल होत आहे अशी खात्रीशीर गोपनीय बातमी मिळाल्याने श्रीरामपूर शहरातील शहरातील वॉर्ड नंबर 2 बाबरपुरा येथे अधिकारी व अंमलदार यांचे पथक व दोन पंचासह छापा टाकून आरोपी नामे 1) समीर मुराद कुरेशी वय 27 वॉर्ड नंबर 2 बीफ् मार्केट जवळ श्रीरामपूर 2) मोहसीन इस्माईल कुरेशी उर्फ बुंदी रा बाबरपुरा वाड नंबर 2 याचे ताब्यातून
1)6,00,000/- कि.चा. बोलेरो पिकप मालवाहू गाडी
1) 26,000/- रु. कि.चे 200 किलो गो वंशीय जनावरांचे मांस
जप्त करण्यात आले.
सदरचे छाप्याचा दोन पंचांसमक्ष पंचनामा करून आरोपी 1) समीर मुराद कुरेशी वय 27 वॉर्ड नंबर 2 बीफ् मार्केट जवळ श्रीरामपूर 2) मोहसीन इस्माईल कुरेशी उर्फ बुंदी रा बाबरपुरा वाड नंबर 2 यांच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे पो. कॉ. नितीन शिरसाठ नेमणूक उपविभागीय कार्यालय श्रीरामपूर यांचे फिर्यादीवरून गुन्हा रजि.न - I l 397/2022 . महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 चे सुधारित कायदा 2015 चे कलम 5,5 ( क) 9 ( अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. स्वाती भोर यांचे मार्गदर्शनाखाली ,Dysp संदीप मिटके ,Asi आरोळे HC सुरेश औटी, पो.ना.भैरवनथ आढागळे,पो.कॉ. नितीन शिरसाठ, आदींनी केली.