शिवप्रहार न्युज - राहुरीच्या वकील पती-पत्नीचा खून?; मृतदेह विहिरीत फेकले...

शिवप्रहार न्युज -  राहुरीच्या वकील पती-पत्नीचा खून?; मृतदेह विहिरीत फेकले...

राहुरीच्या वकील पती-पत्नीचा खून?; मृतदेह विहिरीत फेकले...

   राहुरी (शिवप्रहार न्युज)- राहुरी तालुक्यातील मानोरी येथील रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेल्या वकील दांपत्याचा खून झाल्याचे समोर आले आहे. या वकील दाम्पत्याच्या खूनाच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

     राहुरी तालुक्यातील मानोरी येथील ॲड.राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी ॲड.मनीषा आढाव हे कालपासून रहस्यमयरित्या बेपत्ता झाले होते. त्यांची फोर्ड कार राहुरी कोर्ट परिसरामध्ये संशयितरित्या आढळून आली होती. या पती-पत्नीचे अपहरण झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांना होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गतिमान तपास करत काही आरोपींना ताब्यात घेतल्याचे समजते. आरोपींनी या वकील दाम्पत्याची हत्या करून मृतदेह राहुरी तालुक्यातील उंबरे येथील स्मशानभुमी जवळील विहिरीत टाकून दिला असल्याची कबुली दिली असल्याची माहिती आहे. परंतु आरोपींनी खून कोणत्या कारणातून केला हे समजू शकले नाही.

     घटनास्थळी जिल्हा पोलीसप्रमुख राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे, राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आदिंसह मोठा पोलीस फौज फाटा दाखल झाला आहे.रात्री उशिरापर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते.