शिवप्रहार न्युज - विद्यार्थ्यांचा तांदूळ प्रजासत्ताक दिनाला श्रीरामपूर शहरात रेशन माफियाने पळवला…
विद्यार्थ्यांचा तांदूळ प्रजासत्ताक दिनाला श्रीरामपूर शहरात रेशन माफियाने पळवला…
श्रीरामपूर-आज शहरामध्ये सर्वच शाळांत धुमधडाक्यात प्रजासत्ताक दिन अर्थात 26 जानेवारी साजरा होत असताना याच दिवशी श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर सात भागातील एका शाळेमधून विद्यार्थ्यांसाठी आलेला तांदूळ एका रेशन माफिया/दलालाने शाळास्टाफ सोबत मिलिभगत करुन पळवुन नेल्याची घटना आज घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,आज 26 जानेवारी निमित्त सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर शाळेला सुट्टी असते.त्यामुळे याचा फायदा घेत शाळेतील संबंधित काही मंडळी आणि हा रेशन माफिया/दलाल यांच्या संमतीने गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शासनाने दिलेला तांदूळ धान्य लंपास करण्यात आले आहे.
एका चारचाकी टेम्पोमध्ये हा तांदूळ टाकून पळविण्यात आला.परिसरातील काही जागरूक नागरिकांमुळे ही घटना उघडकीस आली आहे.या घटनेची पोलिसांकडून चौकशी होते की तहसीलदार किंवा प्रांत यांच्याकडून कारवाई होते याकडे या जागरुक नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.