शिवप्रहार न्यूज- १० स्कोर असलेला रुग्ण बेलापूरातील कोवीड सेंटर मध्ये झाला बरा...
१० स्कोर असलेला रुग्ण बेलापूरातील कोवीड सेंटर मध्ये झाला बरा...
बेलापूर- कोरोना मुळे जग थांबलेले असताना आणि जगभर या संसर्गाने हाहाकार केलेला असताना बेलापूर येथील वरदविनायक कोविड सेंटरमध्ये एचआर सिटी १० स्कोर असलेला असलम शेख हा अवघ्या दहा दिवसात बरा होऊन बाहेर पडल्याचा चमत्कार घडला आहे.
याबाबतची सविस्तर हकीकत अशी, बेलापूर येथील असलम शेख या तरुणाचा ५ मे २०२१ रोजी एच आर सी टी स्कोर अवघा १० इतका होता. त्यातच तो पॉझिटिव्ह सुद्धा होता. अशा आव्हानात्मक परिस्थितीत केवळ गोळ्यांवर रुग्ण बरा करणे म्हणजे हे खूप मोठे धारिष्ट्य होते.
मात्र डॉक्टर रामेश्वर राशिनकर आणि डॉक्टर शैलेश पवार यांनी हे आव्हान स्वीकारून आणि रुग्णाला ही विश्वासात घेऊन उपचाराला सुरुवात केली. त्यावर रुग्णाने प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. दिवसा मागून दिवस जात असताना तस तसा या रुग्णाने औषधोपचारास प्रतिसाद देत ११ मे २०२१ रोजी तो पूर्ण बरा होऊन घरी परतला आहे.
सद्यस्थितीत या तरुणास कोणताही त्रास जाणवत नसून लक्षणेही अजिबात नाहीत. जनलक्ष्मी पत्संस्था, साई खेमानंद ट्रस्ट आणि बेलापूर पंचक्रोशीतील अनेक दानशुर अशा सर्वांनी एकत्रित येत हे वरदविनायक कोविड सेंटर सुरू केले आहे .
गेल्या वीस दिवसांपासून सुरू करण्यात आलेल्या या कोविड सेंटरमधून आत्तापर्यंत सुमारे १२५ रुग्णांनी औषधोपचार करत लाभ घेतला आहे.
दोन -तीन रुग्णांचा अपवाद वगळता या सर्व रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बेलापूर पंचक्रोशीत सर्वात अगोदर सुरू झालेल्या या वरदविनायक कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर राशिनकर ,डॉक्टर शैलेश पवार, बेलापूर गाव आणि पंचक्रोशीतील शेकडो नागरिक, जनलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र खटोड, भरत साळुंके, राम पोळ, अरविंद शहाणे, ॲड. साळुंके, साई खेमानंद ट्रस्ट, अभिजीत राका, पप्पू कुलथे ,सचिन कडेकर, प्रसाद उर्फ पप्पू खरात ,भूषण चंगेडे, रमाकांत खटोड ,प्रमोद बिहानी, गणेश मगर, विशाल मेहेत्रे ,शिवसेना शहर अध्यक्ष अशोक राव पवार, अनिल पवार , किशोर राऊत, रमेश कुटे, आनंद दायमा,दिनेश मोडके अशा सर्वांनी झोकून देत या काळात रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे.