शिवप्रहार न्यूज- आज दुपारी वडापाव खरेदीवरून एका तरूणाचा खून…

शिवप्रहार न्यूज- आज दुपारी वडापाव खरेदीवरून एका तरूणाचा खून…

आज दुपारी वडापाव खरेदीवरून एका तरूणाचा खून…

नगर-वडापाव खरेदीवरून झालेल्या वादात एका तरूणाचा खून झाल्याची घटना आज बुधवारी दुपारी नगर शहरातील नवनागापूरात घडली आहे. प्रविण रमेश कांबळे (वय ३५ रा. बालिकाश्रम रोड, सावेडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असल्याचे समजते. 

        दरम्यान या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा आरोपींविरूध्द गुन्हा दाखल झाल्याचे समजते. पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. प्रविण कांबळे हा मंगळवारी नवनागापूरातील एका वडापाव गाडीवर वडा खाण्यासाठी गेला होता. त्याला वडापाव २० रूपयाला रूपयाला असल्याचे सांगितल्यानंतर त्याने २ रूपये कमी करण्यास सांगितले. त्यावरून वडापाव दुकानदार व प्रविण यांच्यात वाद झाले होते. या वादात प्रविणला मारहाण करून त्याचा खून करण्यात आला आहे. 

      सहायक निरीक्षक आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली खुनाच्या घटनेचा तपास सुरू आहे.