शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर MIDC मधून मुलगी पळवली...
श्रीरामपूर MIDC मधून मुलगी पळवली...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर शहरात राहणारी महिला एमआयडीसीमध्ये आपल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला घेवून कामासाठी गेली असता बाहेर चक्कर मारण्यासाठी गेलेल्या मुलीला दुचाकीवर बसवून पळवून नेण्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर शहरात राहणारी महिला मंगळवार दि. २६० मार्च रोजी एमआयडीसीमध्ये कामाला जात असताना सोबत आपल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला घेवून गेली होती. सदर महिला कंपनीमध्ये गेली असता अल्पवयीन मुलगी मी बाहेरून चक्कर मारून येते, असे म्हणून बाहेर गेली तर ती परत आलीच नाही. शेजारच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या दुसऱ्या महिलेने मुलीच्या आईला सांगितले की, तुमच्या मुलीला कोणीतरी मुलाने गाडीवर बसवून आत्ताच नेले आहे. तेव्हा मुलीच्या आईने व नातेवाईकांनी इतरत्र मुलीचा शोध घेतला परंतु ती मिळून न आल्याने मुलीच्या आईने श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून मुलीला पळवून नेणाऱ्या अज्ञात मुलाविरूद्ध भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.