शिवप्रहार न्युज - एक्झिट पोलनुसार केंद्रात मोदी सरकार तर जरांगे पाटलांमुळे महाराष्ट्रातील आकडे बदलले...

शिवप्रहार न्युज -  एक्झिट पोलनुसार केंद्रात मोदी सरकार तर जरांगे पाटलांमुळे महाराष्ट्रातील आकडे बदलले...

एक्झिट पोलनुसार केंद्रात मोदी सरकार तर जरांगे पाटलांमुळे महाराष्ट्रातील आकडे बदलले...

मुंबई/श्रीरामपूर - केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार येणार असल्याचा एक्झिट पोल जवळपास सर्वच राष्ट्रीय पातळीवरील वृत्तवाहिन्यांनी दाखवला आहे.भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ला एक्झिट पोलनुसार साधारण 350 जागा मिळणार असल्याचा एकंदर आकडा आहे.तर इंडिया आघाडीला 150 च्या आसपास जागा मिळतील अशी शक्यता या एक्झिट पोलनुसार व्यक्त करण्यात आली आहे.

       महाराष्ट्र राज्याचा विचार करता महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे व शिवसेना-राष्ट्रवादी फुटीच्या घटनांमुळे यंदाचा कल अतिशय वेगळा दिसत असून 2019 सालासारखे यश महायुतीला मिळणार नाहीये असे दिसते.तरी यंदा महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडीला समान प्रमाणात जागा मिळतील असा या वाहिन्यांचा एक्झिट पोल आहे. महाराष्ट्रात महायुतीला गेल्या वेळेस 48 पैकी 41 जागा मिळाल्या होत्या तर यंदा 25 ते 30 च्या आसपास जागा मिळतील असे अंदाज आहेत.त्यामुळे ४ महिन्यांनी होणारी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अतिशय घासुन होणार असे दिसते आहे.